नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या १००  व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पंतप्रधानांचे सांत्वन केले आहे. त्यासाठी पवारांनी एक ट्विट केले आहे.
शरद पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये मोदींचा उल्लेख नरेंद्रभाई असा केला आहे. त्याचबरोबर शरद पवारांनी मोदींचे सांत्वनही केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये पवार यांनी, नरेंद्रभाई, तुमच्या आईच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. आयुष्यात कधीही भरून न येणारं हे नुकसान आहे! त्याबद्दल शोक व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.” असे म्हटले आहे.

error: Content is protected !!