टाकवे बुद्रुक  :
येथील संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कुल अँण्ड जुनियर कॉलेज या महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, सचिव अशोक बाफना, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सरपंच सुवर्णा असवले यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
प्रसिद्ध व्यख्याते विवेक गुरव यांनी शिक्षणाचा पाया कशा प्रकारे भक्कम केला पाहिजे व घेतलेल्या शिक्षणाचा भविष्यात कुठे कसा वापर करावा याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. गतवर्षी सर्वोत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णा भांगरे, केंद्र प्रमुख शिवाजी जरक, संचालक नथुभाऊ लष्करी, माजी सरपंच प्रल्हाद जाभुळकर, माजी उपसरपंच दत्तात्रय असवले, मा. कार्यध्यक्ष शिवाजी असवले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते राज खांडभोर, मा. सरपंच भुषण असवले, माजी उपसरपंच रोहीदास असवले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष बाबाजी गायकवाड, पो. पाटील अतुल असवले, जेष्ठ सेल अध्यक्ष काळुराम मालपोटे, निवृत्त पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर साबळे, शालेय समिती अध्यक्ष अनिल असवले, चेअरमन पांडुरंग मोढवे, माजी, मुन्नावर आत्तार, माजी  चेअरमन विकास असवले, माजी चेअरमन दिलीप आंबेकर ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आंबेकर मुख्याध्यापक बाळासाहेब उभे सर उपस्थितीत होते. स्नेह संमेलन यशस्वी करण्यासाठी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर बांधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्नेहसंमेलन कार्यक्रमात सायंकाळी संपन्न झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मंगळागौर, वासुदेव, प्रबोधनकार निवृत्त महाराज देशमुख, बाल शिवाजी, गवळण, पंढरीची वारी, शेतकरी, ठाकर, पोतराज, धनगराची लेकरे, गोंधळ, कोळी, वाघ्या मुरळी, लावणी, महाराष्ट्र गीत विविधतेतून एकतेमध्ये महाराष्ट्राच्या लोकधारेचे सौंदर्य खुलून दिसले. महाराष्ट्र गौरवगीत सादर करत महाराष्ट्रातील विविध रूढी- चालीरीतीचे दर्शन घडविण्यात आले.

error: Content is protected !!