इंदोरी:
प्रगती विद्या मंदिर व ह .भ. प .आ. ना.काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज इंदोरी प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ  उत्साहात संपन्न झाले. संमेलनाच्या पहिल्या दिवशी सर्व देणगीदार माजी विद्यार्थ्यांचा
स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला.
ढोल लेझीमच्या निनादात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि प्रशालेचे माजी विद्यार्थी इत्यादी सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले .
याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य सुदाम वाळुंज यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  विद्यालयातील भौतिक सुविधांसाठी माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या भरघोस देणगी स्वरूपातील निधीतून प्रत्येक वर्गात ऑडिओ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी नवीन 8 फूट जीना, मैदानावर टाकण्यासाठी ग्रीड, संगणक कक्षामधील फर्निचर, तीन हजार लिटर पाण्याची टाकी, गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क भरण्यात आले, इत्यादी कामे करण्यात आली.माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेस केलेल्या मदतीबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याबरोबरच भविष्यात   विद्यार्थी संख्या  वाढल्यास आवश्यक असणारे स्वच्छता गृह, शाळेच्या प्रवेशद्वारापासून पासून जिन्यापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे, पहिल्या मजल्यावर असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छता गृहांची व हात धुण्याची सोय  इत्यादींची गरज असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
यावेळी  
कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत सुदाम भसे होते, संमेलनाचे ध्वजारोहण उद्योजक रमण महादू पवार  यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते फिलिप्स इंडिया लिमिटेडचे इंजीनियरिंग मॅनेजर  माजी विद्यार्थी  संदीप जगन्नाथ हिंगे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य मुकेश शिंदे,संदीप बाळासाहेब ढोरे , विशेष कार्यकारी दंडाधिकारी संजय चव्हाण, सीमला ऑफिस मधील अधिकारी  विजय दर्शले,   प्रगतशील शेतकरी दत्तात्रय घोजगे, आपुलकी हॉटेलचे मालक सुनील दाभाडे, सागर शिंदे, ,नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यविनोद भागवत, मयूर शेवते, सचिन काळे यांनी 2002 च्या बॅचच्या वतीने विद्यालयासाठी  20000 रुपयांचा धनादेश दिला.
राजेंद्र माने, पांडुरंग येवले, गणेश शिंदे ,महेश बाणेकर, सुरेश राऊत,  संतोष बालघरे,महेश वाळुंज, सुवर्णा शिंदे, सुरेखा तुपे, शबाना सय्यद,  शिल्पा झुरंगे ,  भेगडे शितल , छाया काशिद, सुषमा गराडे,नीता भागवत,शालेय समीतीचे अध्यक्ष दामोदरजी शिंदे उपस्थित होते .
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकेही देण्यात आली.
बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणूननूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे,  उपाध्यक्ष गणेश खांडगे,सचिव संतोष खांडगे, संचालक गोपाळे गुरुजी, महेशभाई शहा, शंकर नारखेडे, इंदोरी गावचे लोकनियुक्त सरपंच शशिकांत शिंदे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी चे अध्यक्ष विन्सेंट सालेर अध्यक्ष भंडारा देवस्थान ट्रस्ट साहेबराव काशीद, वडगाव मावळ पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, माजी उपसरपंच प्रशांत भागवत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य दिलीप ढोरे,माजी आदर्श सरपंच संदीप काशीद प्रगती विद्या मंदिर व ह. भ.प.आ.ना.काशीद पाटिल ज्यु कॉलेजचे शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे, लायन्स क्लब ऑफ तळेगावचे माजी अध्यक्ष दीपक बाळसराफ,बुद्धिबळ प्रशिक्षक श्री. राजेंद्र माने इत्यादी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. संतोष खांडगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता वाढ कशी होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन शिक्षकांनी देखील विद्यार्थी गुणवत्ता वाढ होण्यासाठी आणि तालुक्यात दहावीचा विद्यार्थी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा कसा येईल यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नामवंत लेखिका आणि मराठीच्या गाढया अभ्यासक डॉ. नीलिमाताई गुंडी यांनी मराठी भाषेचे महत्व आणि मराठीतील काही गमती जमती,शब्दांमुळे होणारे खेळ,शब्दा शब्दांमधून व्यक्त होणारे अर्थ याबद्दल आपले विचार मांडले.
सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. संमेलनाच्या प्रसंगी माजी मुख्याध्यापिका केतकर मॅडम, पांडुरंग पोटे, संजय वंजारे, भास्कर पुंडले,  यतिनभाई शहा, उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या बक्षिसांचे देणगीदार माजी मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे,वार्षिक स्नेहसंमेलनाचे संपूर्ण नियोजन प्राचार्य सुदाम वाळुंज ,पर्यवेक्षक राजेंद्र वाजे सांस्कृतिक विभाग प्रमुख दिलीप पोटे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच  संमेलन प्रमुख मच्छिंद्र बारवकर आणि शोभा कदम गुलाब ढोरे दीपक डांगले यांनी आयोजन केले  .
विद्यार्थी नृत्य आणि ढोल लेझीम हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते यासाठी विद्यालयाच्या ज्येष्ठ अध्यापिका ज्योती पिंजण, रेखा भेगडे, अश्विनी शेलार , मंगल काळे,  ,विजय वरघडे, संजय खराडे, दिलीप हेरोडे, समीर गाडॆ,  स्वाती गाडे,, शैला गायकवाड ,संतोष कदम ,रूपेश शिंदे यांनी उत्कृष्ट नियोजन केले.  प्राचार्य सुदाम वाळुंज यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या कार्याचा अहवाल,माजी विद्यार्थ्यांनी सुमारे साडेपाच लाख रुपये निधी शाळेसाठी दिला. व त्यातून केलेली विकास कामे याची माहिती दिली. भविष्यकाळातील शाळेत करावयाची कामे याविषयी आढावा घेतला.
सूत्रसंचालन मोहिनी ढोरे,अलका आडकर ,स्वेता मोहिते ,अश्विनी शेलार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार लक्ष्मण मखर व दिलीप पोटे यांनी मानले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व पाहुण्यांनी व विद्यार्थ्यांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला. शाळेतील झालेल्या सर्व कार्यक्रमांचा पाहुण्यांनी तोंड भरून कौतुक केले.

error: Content is protected !!