पवनमावळ भागातील शाळांमध्ये भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी प्राधान्य देणार- पद्मभूषण रज्जू श्रॉफ
पवनानगर :
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थांंकडे अनेक कला गुण असून त्यांना पुढे आणायचे असेल तर त्यांना त्यांच्या भौतिक सुखसुविधा देणे गरजेचे असून यासाठी पवनमावळ भागातील शाळांमध्ये स्वच्छता, पर्यावरणीय क्रिडांगणे व क्रिडा साहित्यासारख्या भौतिक सुखसुविधा पूर्ततेसाठी प्राधान्य देणार असल्याचे मत पद्मभूषण शास्त्रज्ञ रज्जू श्राफ यांनी पवनानगर येथे व्यक्त केले
पवना शिक्षण संकुल पवना विद्या मंदिर शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रॉफ बोलत होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे होते
यावेळी उद्योजक प्रदिप सागर,शिल्पा सागर, पवना असोसिएशनचे जनरल मॅनेजर रोहित श्रीवास्तव, सेक्रेटरी सुमित चोक्सी, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, संस्थेचे संचालक सोनबा गोपाळे, महेशभाई शहा, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, प्राचार्या अंजली दौंडे, कालेचे सरपंच खंडु कालेकर, उपसरपंच आशा कालेकर, माजी उपसरपंच फुलाबाई कालेकर,किसन घरदाळे, अरुण नायर, मधुकर काळे,माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर ठाकर, भास्कर खैरे,पवना फुल उत्पादक संघाचे संस्थापक मुकुंद ठाकर तानाजी शेंडगे, संतोष ठुले, बबनराव कालेकर, सचिन मोहिते, प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष गोरख जांभूळकर, शिक्षक प्रतिनिधी गणेश ठोंबरे  आदी मान्यवर व पालक उपस्थित होते शरद बुट्टे पाटील म्हणाले”,विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास करायचा असेल तर शिक्षक,पालक व विद्यार्थी ह्या त्रिकोणाचा वापर करूनच मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवता येते
विद्यार्थ्यांना भविष्यात शास्त्रज्ञ ,कवि ,साहित्यिक , प्रशासन अधिकारी व्हायचं असेल तर विद्यार्थ्यांनी पुस्तकाशी मैत्री करावी
यावेळी अध्यक्षीय भाषणात माजी राज्यमंत्री  बाळा भेगडे म्हणाले “, समाज परिवर्तानाचे काम व विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षक करत असतो. शिक्षकांबरोबर पालकांची देखील विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची जबाबदारी आहे.ग्रामीण भागात शाळांमध्ये ज्या भौतिक सुविधा नाहीत त्यासाठी विविध कंपन्यांच्या सीएसआर फंड उपलब्ध करून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
प्रास्ताविकात संस्थेचे सचिव संतोष खांडगे म्हणाले ,”  पत्र्याच्या शेडमध्ये सुरु झालेले पवना शाळेमध्ये अनेक बदल झाल्याचे दिसून येते यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात पुढे केला त्यामुळे हा बदल झाला असल्याचे दिसून येतो.
यावेळी पवना असोसिएशनचे वतीने पवना विद्यालयास सुसज्ज स्वच्छतागृह बांधून देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली तर पवना असोसिएशनच्या वतीने शाळेतील ३५ आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरुन त्यांना मदतीचा हात दिला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष  संतोष खांडगे यांनी केले. सुत्रसंचालन सुवर्णा काळडोके,रोशनी मराडे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका निला केसकर यांनी मानले. 

error: Content is protected !!