मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन विशेष:
सह्याद्रीच्या कुशीत हिरवीगार शाल पांघरलेल्या व पवनामाईच्या खो-यात असलेल्या ‘येळसे’ हे गाव या पवनामाईच्या रत्नांनी  आप आपल्या  क्षेत्रात पवन मावळचे नाव सुवर्ण अक्षराने उज्वल केले आहे. या क्षेत्रात पत्रकारीता देखील अपवाद नाही.
याच रत्नामध्ये अजून एक रत्न म्हणजे येळसे गावाच्या शेतकरी कुटुंबातील भाऊ  ठाकर यांचे चिरंजीव  निलेश ठाकर.  निलेशचा जन्म येळसे गावात झाला. तर शिक्षणाची मुहृतमेढ जिल्हापरिषद प्राथमिक शाळा शिंदगाव या ठिकाणी झाली. तर निलेश हा शाळेत हुशार मुलगा.
  सर्व शिक्षकांचा आवडता मित्रांना मदत करणारा प्राथमिक शिक्षण शिंदगाव येथे केल्या, नंतर इयत्ता पाचवीला नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पवना विद्या मंदिर शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शाळेत असताना दिसायला लहान  हसत मुख चेहरा असल्याने सर्वाचा लाडका ‘सोन्या’ बनला शाळेतील प्रत्येक कार्यक्रमात निलेश सहभाग घेत यामुळे विविध कला त्याला शालेय वातावरणामुळे अवगत होऊ लागला.
   दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर काॕलेजला न जाता घराला हातभार लागावा हेतूने आय टी आय नागरगाव येथे व्यावसायिक प्रशिक्षण पुर्ण केले. कष्ट  करण्याची सवय लागल्याने निलेश शेतामधील विविध भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी आई वडिलांना मदत करु लागला. शिक्षण पूर्ण करत असताना काही तरी नवीन करण्याची धडपड करु लागला.
    हळूहळू मावळ तालुक्यातील गडकिल्ले संवर्धन करण्याची प्रेरणा मिळू लागली तर शिक्षणा बरोबर सर्व सामन्यांच्या प्रश्नाना वाचा फोडण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारीता वयाच्या १७ व्या वर्षी २०१५ साली सुरु केली.  मावळातील सर्वात लहान पत्रकार म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. पत्रकारितेत महत्त्वाचे म्हणजे लेख लिहणे यामध्ये त्याने त्याचे वेगळे नाव निर्माण केले आहे.
पत्रकार हा निपक्षपाती असावा हे निलेश हे उदाहरण असून सर्व पक्षीय नेता असो कार्यक्रता असो व सामान्य नागरिक त्याच्याकडे कोणीही बोट करु शकत नसल्याने तो सर्वसमावेक्षक निपक्षपाती,अभ्यासू, हुशार, पत्रकार  म्हणून नावलौकिक मिळवत निलेश नी वेगळीच ओळख  बनवली आहे.
पत्रकारितेत एक वेगळे नाव निर्माण केल्याने त्यांचा विविध संस्थानी पत्रकारिते बदल सन्मान देखील केला आहे. तर पोलीस प्रशासनाचा जवळचा सहकारी व  अधिकारी वर्गात एक तरुण पत्रकार म्हणून वेगळी ओळख आहे.
पत्रकारिते बरोबर निलेशने गडकिल्ले संवर्धनासाठी फक्त लेखणी हातात न घेता. गडकिल्ले संवर्धनाचा वसा स्वताच्या कृतीतुन स्विकारला आहे.
विविध गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या संस्थेचा क्रियाशील सदस्य म्हणून काम करत आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या नात्याने समाजाशी बांधिलकी जपणारा पत्रकार अशी आता निलेशची ओळख निर्माण झाली आहे.
पत्रकारिता करता करता समाजाला मदत करताना दिसतो कोल्हापूर हे पुरग्रस्त झाले त्यावेळी निलेश हा स्वता कोल्हापूर येथे जाऊन पुरग्रस्तांना मदत करताना दिसला तर कोरोनाच्या काळात देखील घरात बसून न राहता रस्त्यावर येऊन मदत करताना व कोरोनाग्स्त नागरिकांना मदत करताना हा कोरोना योध्दा दिसला व ज्यांना मदतीची गरज पाहिजे अशा नागरिकांना विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गरजूंना मदत करताना दिसला आहे.
निलेश नी विविध वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल. विविध न्युज पोर्टल असे यांना त्याने काम केलं आहे. व समाजातील घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तो हळूहळू प्रगती करत आता मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे  प्रसिध्दी प्रमुख म्हणून जबाबदारी त्याचे कडे आहे. ( शब्दांकन-  संजय हुलावळे,,कार्ला)

error: Content is protected !!