तळेगाव स्टेशन:
टाकवे खुर्द येथील लोकनियुक्त सरपंच  तुशांत ( दादा ) कैलास ढमाले यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच सेल च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात  आली,राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी ढमाले यांना नियुक्ती पत्र दिले. माजी सरपंच विठ्ठल मोहिते,माजी उपसरपंच अनिल मोहिते उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष तुशांत ढमाले म्हणाले,” मावळचे आमदार सुनिल शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सेलचे काम केले जाईल.मावळ तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांना गावपातळीवरील सर्वागीण विकास कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. सरपंच सेलच्या व्यासपीठावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कटिबद्ध आहे.

error: Content is protected !!