मावळ तालुका ग्रामपंचायत निवडणुक
वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसने सात ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली असून अटीतटीच्या भोयरे ग्रामपंचायतीवर भाजपाने बाजी मारली आहे.
येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येऊन मतदारांना विजयाची गळ घातली होती.
मावळ तालुक्यात आमदार सुनिल शेळके व माजीमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीला झुकते माप देत विजयी केले. आंदर मावळातील भोयरे व निगडे ग्रामपंचायत निवडणूकीच्या दरम्यान,पालकमंत्री पाटील यांनी या दोन्ही ग्रामपंचायतींना भेट दिल्याने संपूर्ण तालुक्याचे या निवडणुकीकडे लक्ष होते.
तर जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर उतरावे लागते,तालुक्यांतील भाजपाच्या नेतृत्व सक्षम नाही का?असा घणाघात आमदार सुनिल शेळके यांनी भाजपच्या नेतृत्वावर केला होता. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या पूर्वेला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. सद्यस्थितीत राष्ट्रवादीने आघाडीने घेतल्याचे स्पष्ट दिसते.
ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी सरपंच पुढील प्रमाणे:
शिरगाव- प्रविण साहेबराव गोपाळे (बिनविरोध)
देवले- वंदना बाळू आंबेकर (राष्ट्रवादी)
इंदोरी-शशिकांत राजाराम शिंदे (राष्ट्रवादी)
वरसोली-संजय खांडेभरड (राष्ट्रवादी)
निगडे-भिकाजी मुक्ताजी भागवत (राष्ट्रवादी)
सावळा- मंगल नागू ढोंगे (राष्ट्रवादी)
भोयरे- वर्षा अमोल भोईरकर (भाजप)
कुणे ना.मा.- सुरेखा संदीप उंबरे(भाजपा)
गोडुंब्रे-निशा गणेश सावंत (भाजप) हे निवडून आले आहे.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,” विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमदार सुनिल शेळके यांच्या विकासाच्या झंझावाताला मतदारांनी दाद दिली. मावळ तालुक्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राबवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,गावकरी,मतदार यांच्या सामूहिक प्रयत्नाचे हे यश आहे. हा विजयाचा जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना समर्पित करण्यात येत आहे.

error: Content is protected !!