सोमाटणे:
लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुका राष्ट्रवादी ओबीसी महिला सेलच्या वतीने सोमाटणे पंचक्रोशीतील शेतकरी महिलांचा थेट शेताच्या बांधावर जाऊन सत्कार करण्यात आला.
मावळ तालुका राष्ट्रवादी ओबीसी महिला सेलच्या अध्यक्षा
संध्या थोरात, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सविता मंचरे,रेखा बरीदे, वनमाला दळवी ,लीना दिघे,तळेकर ताई,शिल्पा चौधरी,नलिनी गायकवाड उपस्थित होत्या.शीतल मु-हे ,आशा मुऱ्हे,चेतना मुऱ्हे,नलिनी गायकवाड,सुरेखा जगदाळे या शेतकरी महिलांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी ओबोसी सेलच्या महिला अध्यक्षा संध्या थोरात म्हणाल्या,” लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे सर्वागीण व्यासंग असलेले लोकनेते असून स्व.यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय,सामाजिक क्षेत्राशी समरस असलेले देश पातळीवरील एकमेव नेते आहे.
कृषी क्षेत्राचे जाणकार असलेल्या साहेबांचा वाढदिवस शेतकरी महिलांचा सत्कार करताना आम्हाला आनंद होत आहे,असे सांगून थोरात म्हणाल्या,”लोकनेते शरद पवार हे राजकारणातील एकमेव नेते असे नेते आहेत,ज्यांचे राजकारण,समाजकारण,अर्थकारण,नाट्य,संगीत,साहित्य,कला ,क्रिडा क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील व्यासंग फार मोठा आहे.

You missed

error: Content is protected !!