गावठाणापासुन दोनशे मीटर परिसरातील जमीन एन ए करुन घ्या
काले काँलनी मंडल अधिकारी प्रकाश बलकवडे यांचे आवाहन
पवनानगर:
पवनमावळ परिसरातील नागरिकांना/ खातेदारांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या शासन परिपत्रक क्रमांक एन ए पी-2021/प्रक-118/ज-1अ दिनांक 13/04/2022 चे कलम 122 अन्वये गावठाण म्हणून घोषित असलेल्या गावाच्या गावठाणापासून 200 मीटर च्या परिघातील गटांना अकृषीक आकारणी करून देणेबाबत शासनाने आदेशित केले आहे.
त्यासंदर्भाने गावकामगार तलाठी यांचेकडून सदर अकृषिक आकारणीची नोटीस प्राप्त करून घ्यावी.नमुद रक्कम शासन जमा केले नंतर, शासन निर्णयातील विहित नमुन्यातील सनद तहसिलदार कार्यालयामार्फत संबंधित खातेदारांना प्रदान करण्यात येणार असून सदर सनदीद्वारे आपले क्षेत्र अकृषिक झाल्याचे समजण्यात येणार आहे.
तरी पवनमावळ भागातील काले काँलनी सजेतील सर्व (गावठाणापासून २०० मीटरच्या आतील)नागरिक खातेदारांनी आपली जमिन अकृषिक करण्याची किचकट प्रक्रिया टाळून शासनाच्या या सुलभ योजनेचा लाभ घेणेसाठी आपले तलाठी कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा असे आव्हान काले काँलनी मंडल अधिकारी प्रकाश बलकवडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!