आधी पक्के घरे बांधा:  किशोर आवारे
तळेगाव स्टेशन:
डीपी रोडच्या रुंदीकरणांमध्ये कायम रहिवासी असणाऱ्या नागरिकांची राहती घरी पाडून त्यांना बेघर करू नका त्यांना राहण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पक्क्या घरांची व्यवस्था करावी तसे न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी दिला आहे.
म्हाडाच्या प्रस्तावित रोड साठी अडसर असणाऱ्या तीन घरांना तातडीने पाडण्याची नोटीस नगरपरिषद प्रशासनाने दिली होती तेथील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु किशोर आवरे यांनी आक्रमक पवित्रा घेत येथील रहिवाशांना दिलासा मिळवून दिला आहे. आधी लोकांच्या कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था करा मगच त्यांची घरे पाडा असे खडसावून किशोर आवारे यांनी नगर प्रशासनाला सांगितले आहे.
तळेगाव शहरात अनेक अनाधिकृत बांधकामे आहेत तसेच ग्रीन झोन मध्ये देखील अनेक अनधिकृत बांधकामे होत आहेत धनाढ्य बिल्डर्स व काही राजकीय आश्रय असणाऱ्या धनिकांचे अनधिकृत बांधकाम मुख्याधिकाऱ्यांनी पाडून दाखवावे मगच गरिबांच्या घरांना हात लावावा. एकही गरीबाचे घर पुनर्वसन झाल्याशिवाय तोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा किशोर आवारे यांनी घेतला.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेने सध्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे, ती करत असताना येथील जोशी वाडी मधील रहिवाशांना रस्ता रुंदीकरणात अडथळा येणारी घरे पाडण्यात येतील असे वेळोवेळी नोटिसीद्वारे नगरपरिषदेने कळवले होते, त्यामुळे किशोर आवारे यांनी सर्व नागरिकांना घेऊन नगरपरिषदेमध्ये जाऊन नगरपरिषद प्रशासनाला फैलावर घेतले.
सुमारे 40 वर्षापासून ही लोक जोशी वाडी परिसरामध्ये राहत आहेत डीपी रोड करताना राजकारणी लोकांनी आपल्या सोयीनुसार डीपी रोड मध्ये बदल केला त्यामुळे गरिबांच्या घरांवर हातोडा पडत असल्याचे नगरसेवक अरुण माने यांनी नमूद केले.
नगरपरिषदेने जुन्या नगरपालिकेची इमारत जर  काम सुरू करायचे नव्हते तर इतक्या घाईने का पाडली? असा सवाल आवारे यांनी विचारला. नवीन इमारतीमध्ये स्वतःची जागा नसताना देखील तीन करोड रुपये खर्चून फर्निचर केले आहे हा जनतेच्या पैशाचा अपव्यय असून जनतेच्या पैशावर डल्ला मारू नये असा सवाल आवारे यांनी मुख्याधिकाऱ्यांना केला आहे.
मुख्याधिकारी यांनी राजकीय मंडळींच्या हातातील बाहुले न होता स्वतःच्या बुद्धीला पटेल असे काम करावे असे नगरसेवक सुनील कारंडे यांनी यावेळी नमूद   केले .
संपूर्ण ४६  कुटुंबांना पक्क्या घरांचा दिलासा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत एकही घर पाडू देणार नाही जर गरिबांच्या घराला हात लावाल तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा किशोर यांनी यावेळी दिला. यावेळी माजी नगरसेवक अरुण माने रोहित लांघे सुनील कारंडे प्रवक्ते मिलिंद अच्युत कल्पेश भगत सुनील पवार अनिल भांगरे आदी मान्यवर मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या दालनात उपस्थित होते.

error: Content is protected !!