जैन बांधवांचे सामाजिक योगदान महत्त्वाचे :किशोर आवारे
तळेगाव दाभाडे:
जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या झारखंड मधील श्री सम्मेद शिखर या स्थळाला पर्यटन क्षेत्र घोषित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात तसेच गुजरात मधील पवित्र तीर्थक्षेत्र शत्रुंजय तीर्थ पाली थानाचे पावित्र्य भंग करणाऱ्या समाजकंटकांच्या निषेधार्थ मावळ तालुक्यातील सकल जैन समाजाच्या वतीने बुधवारी सर्व व्यवहार बंद ठेवून तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. राज्य शासनाने जैन समाजाचे भावनांची त्वरित दखल न घेतल्यास बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा देण्यात आला.
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रकाश ओसवाल ,सुकन बाफना, अनिल मेहता, भूषण मुथा ,कुंदन बाफना नेमीचंद गुंदेशा , लालचंद  मुथा आदींनी मनोगत व्यक्त केले.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी जैन धर्मियांच्या निषेध मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला तसेच जैन धर्माच्या भावनांचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा जैन धर्मात एवढी ताकद आहे की कुठलेही सरकार जैन समाज उलथून लावू शकतो असे आवारे यांनी प्रतिपादन केले.
याप्रसंगी प्रकाश ओसवाल, सुकन बाफना किरण ओसवाल ,दीपक ओसवाल, दिनेश वाडेकर ,रमेश ओसवाल, संकेत शहा, सुरेश बाफना, सचिन ओसवाल, राजेश बाफना, भूषण मुथा, लालचंद मुथा, दिलीप ओसवाल, पंकज गदिया, भरत मोदी, नेमीचंद बाफना, कुंदन बाफना, दिलीप मुथा, करण ओसवाल, महेंद्र ओसवाल , मिलिंद अच्युत उपस्थित होते.

error: Content is protected !!