टाकवे बुद्रुक येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी व  चष्मे वाटप
टाकवे बुद्रुक:
येथील शिवशाही मित्र मंडळ व व्हिजन स्प्रिंग फाऊडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांनाकरीता मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात येणार आहे व्हिजन
स्प्रिंग संस्थेने मावळ तालुक्यात आरोग्य सेवा मागील अनेक दिवसांपासून देत असुन अनेक ठिकाणी लहान मुलापासून ते वयवृद्ध नागरिकांना मोफत चष्मे वाटप करत आहेत.
मुख्य कार्यक्रमाचे आयोजन शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले असुन नेहमीच सार्वजनिक उपक्रम राबविण्यात टाकवे गावात अव्वल असलेल्या शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .
शिबीर सोमवार व मंगळवार सकाळी १० ते ४ यावेळेत दोन दिवस जिल्हा परिषद शाळा टाकवे व न्यु इग्लिश स्कुल टाकवे याठिकाणी  आयोजित करण्यात आले आहे.मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!