तळेगाव स्टेशन :
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीतर्फे जिल्हा प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांच्या हस्ते सृजन नृत्यालयाच्या संस्थापक डॉ. मीनल कुलकर्णी, नाट्य निर्माता आणि दिग्दर्शक अॅड. विनय दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप पानसरे यांना तळेगावभूषण पुरस्कार, तर सर्पमित्र भास्कर माळी यांना कर्तव्यदक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एमराल्ड रिसॉर्टच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बोलताना डॉ. परमार यांनी पुरस्कारार्थीचे अभिनंदन करीत रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. रोटरी सिटीच्या वतीने सेवाधाम ग्रंथालयास पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. क्लबचे अध्यक्ष दीपक फल्ले यांनी केलेल्या कामाचे परमार यांनी कौतुक केले.
नवीन सदस्यांनी रोटरी सिटीचे सभासदत्व ग्रहण केले. रोटरीचे सहायक प्रांतपाल मंगेश गारोळे, संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, सोनबा गोपाळे, दिलीप पारेख, संतोष शेळके, संजय मेहता आणि मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. सुरेश शेंडे यांनी अहवाल वाचन केले.
सूत्रसंचालन मिलिंद निकम, पुरस्काराचे वाचन भगवान शिंदे तर आभार प्रदर्शन शाहीन शेख यांनी केले. अध्यक्ष दीपक फल्ले, किरण ओसवाल, प्रशांत ताये, संजय वाघमारे, रेश्मा फडतरे, शरयू देवळे आणि रोटरी सदस्यांनी नियोजन केले.

error: Content is protected !!