वडगाव मावळ :
वडगाव शहर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने केशवनगर जिल्हापरिषद शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केशवनगर जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सहभाग घेऊन उत्कृष्ट चित्रे रेखाटली होती.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा पद्मावती ढोरे, कार्याध्यक्षा वैशाली ढोरे, उपाध्यक्षा आरती राऊत, भाग्यश्री विनोदे, पदाधिकारी अक्षदा ढोरे, करुणा पवार रुपाली चव्हाण, जयश्री मालपोटे, सुजाता घारे, रुपाली तुमकर, सारिका विनोदे, उर्मिला काकडे, रेश्मा ढोरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पद्मावती ढोरे यांनी प्रास्ताविक केले, वैशाली ढोरे यांनी सूत्रसंचालन केले तर भाग्यश्री विनोदे यांनी आभार मानले.

You missed

error: Content is protected !!