मावळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकांचा प्रचार शिगेला
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भोयरेतील प्रचार सभेला हाजेरी
टाकवे बुद्रुक:
मावळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला असुन या निवडणूकीत आपल्या समर्थक उमेदवारांनचा प्रचार करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मावळ तालुक्यात हाजेरी लावली होती
भोयरे येथे घेण्यात आलेल्या प्रचार सभेत संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले २०१४ साली केंद्रात आलेल्या मोदी सरकार व राज्यात आलेल्या फडणवीस सरकारमुळे या देशाचा व राज्याचा उत्कर्षाचा कालावधी सुरु झाला असुन मोदी सरकारच्या २०१४ ते १९ च्या पहिल्या टप्प्यात लोकांना लागणाऱ्या किमान सुविधा द्यायच्या त्यामध्ये लोक सुखी समाधानी व आनंदी होतील त्यानंतर २०१९ ते २४ या कालावधीत प्रामुख्याने देश जगात उच्च स्थानावर नेण्यासाठी अर्थिक प्रगती करणे देशाच्या सीमा सुरक्षित करणे यासारखे निर्णय घेण्यात आले तसेच या आगोदर असलेल्या फडणवीस सरकारच्या योजनामुळे नागरिकांना झालेल्या लाभाची आकडेवारी सांगितली तसेच
मधल्या काळात आलेल्या महाविकास आघाडी सरकारने नळ पाणी पुरवठा योजना आमची असल्याचे खोट सांगत असुन  ७० हजार कोटी रुपये खर्च करुन ही नळ पाणी पुरवठा योजना ही केद्र सरकारने आणली आहे
या प्रकारच्या सरकारने दिलेल्या सुविधा पाहता चांगल्या  विचाराची लोक ग्रामपंचायत निवडून द्या गावाच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून बाधिल राहाणार असल्याचे सांगत निवडणूकीत उभे असलेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर  माजी मंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, माजी उपसभापती शांताराम कदम, टाकवे नाणे भाजप जिल्हा परिषद गट अध्यक्ष रोहीदास असवले, आंदर मावळ अध्यक्ष गणेश कल्हाटकर, भैरवनाथ पँनल प्रमुख अमोल भोईरकर, उद्योजक सचिन पांगारे यासह भोयरे सावळा, सरपंच व सदस्य पदाचे उमेदवार उपस्थितीत होते.

error: Content is protected !!