मुंबई:
छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबत कोणी ना कोणी सतत वादग्रस्त विधान करत आहे. त्या वादग्रस्त विधानाचा आम्ही निषेध करत आहोत. त्यांनी अशी वादग्रस्त विधान करू नये. त्यांने आम्ही दुखावले जातो, याचा जाब विचारण्यासाठी आम्ही ही  रस्त्यावर उतरणार आहोत अशा इशारा मुंबई डबेवाला असोसिएशनने दिला आहे.
अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले,”आम्ही मुळचे मावळे आहोत पुणे जिल्यातील चोवीस मावळातून आम्ही कामासाठी मुंबईत आलो आहोत.
एक काळ असा होता आमच्या हातात ढाल होती तलवार होती आम्ही गड किल्ले चढत होतो, गड जिंकत होतो.. आता आमच्या हातात जेवणाचा डबा आहे व दादर आणी शिड्या चढून आम्ही तो डबा पोहचवतो. आमचे पुर्वज स्वराज्यासाठी प्राणपणाने लढले कारण छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत.
या दैवताच्या नुसत्या इशाऱ्यांवर हिंदवी स्वराज्यासाठी आमचे पुर्वज गणिमांशी झुंजत होते. आमच्या दैवता बाबत चुकीचे वक्तव्य कोणी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही.
महाराष्ट्राचा वारंवार अपमान करणाऱ्या महाराष्ट्रविरोधी लोकांविरुद्ध महाविकास आघाडीने विशाल मोर्च्याची घोषणा केली आहे.
१७ डिसेंबर २०२२ रोजी हा विराट मोर्चा निघणार आहे. या मोर्चात आम्ही आमचा सहभाग नोंदवणार आहे असल्याचे  सुभाष तळेकर अघ्यक्ष  मुंबई डबेवाला असोशिएशन यांनी सांगितले.

error: Content is protected !!