प्रभा शिवणेकर वसंत अवसरीकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
तळेगाव दाभाडे :
विनोदसम्राट दादू इंदुरीकर लोककला प्रतिष्ठानच्या उद्घाटनाचे औचित्य साधून विनोदसम्राट दादू इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील कलाकार प्रभा शिवणेकर व वसंत अवसरीकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार दादू इंदुरीकर लोककलाप्रतिष्ठान व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे अध्क्ष म्हणून प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी, विशेष निमंत्रित अभिनेत्री सविता मालपेकर, लावणी कलावंत अर्चना जावळेकर व संगीता लाखे आदी उपस्थित होते.
या वेळी अभिनेत्री सविता मालपेकर यांनी प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील एक प्रसंग मंचावर सादर केला, मोहन जोशी यांनीही त्यांना साथ दिली. प्रास्ताविक सुरेश धोत्रे यांनी केले. राजेश बारणे यांनी सूत्रसंचालन, तर आभार अॅड. रंजना भोसले यांनी केले.

error: Content is protected !!