ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे ब्राम्हणोली ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्याच्या वेळ
पवनानगर:
पवना धरणाच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ग्रामस्थांना दूषित  पाणी पिण्याच्या वेळ आली आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
वारु ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या ब्राम्हणोली गावला कायम पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे पवना धरणाच्या भिंतीलगत ब्राम्हणोली गाव असुन या गावात कर्मचारी,सरपंच व ग्रामसेवक यांच्यामध्ये समन्वय नसल्याने पिण्याचे पाणी अनियमित सोडले जात आहे त्यामुळे महिला भगिनींनी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे
पाणी वितरण करणाऱ्या पाण्याच्या टाकीत सापडल्या  अळ्या – तीन दिवस ग्रामपंचायत अंतर्गत पाणी न आल्याने गावचे ग्रामस्थांनी सरपंच,ग्रामसेवक व कर्मचारी यांना विचरणा केली असता पाण्यची टाकी स्वच्छ करण्यासाठी पाणी सोडले नाही परंतु ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता त्या टाकीत जंतु व अळ्या आढळल्यचे निदर्शनास आले त्यानंतर ग्रामसेवक यांना विचारले असतो कर्मचारी यांना वारंवार याबाबत सूचना देण्यात येतात परंतु गावातील सदस्य सहकार्य करत नाही तसेच त्यांच्या समन्वया अभावी अशी परिस्थिती उद्भवली आहे.
याबाबत सरपंच शाहिदास निंबळे यांना विचारले असता ते म्हणाले की, पाण्यची टाकी स्वच्छ करण्याचे काम सुरु होते त्यामुळे दोन पाण्यत अनियमितता आढळून आली पुढील काळात नियमित पाणी मिळेल
याबाबत माजी उपसरपंच मारुती काळे म्हणाले की, गावात कायम पिण्याच्या पाण्यची बोंब असते तसेच ग्रामपंचायतीचा कर्मचारी सरपंच, ग्रामसेवक यांचे ऐकत नाही उलट ग्रामस्थांना अरेरावी करुन उत्तरे ऐकविली जातात जर पाणी नियमित आले नाही तर गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात हंडा मोर्चा काढण्यात येईल
याबाबत सोनू काळे (कार्याध्यक्ष पवनमावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेस म्हणाले की, माझ्या घरातील पाण्याच्या नळाला दूषीत पाणी आले आणि त्यामध्ये अळ्या सापडल्या याचा अर्थ    वर्ष वर्ष टाकी स्वच्छ केली जात नाही.

error: Content is protected !!