वडगाव मावळ:
  ग्रामीण भागातील पी एम पी एल बस सुविधा बंद झाल्यामुळे प्रवाशी नागरिकांचे अतोनात हाल होत आहे.
ग्रामीण भागातील पीएमपीएल बस बंद करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांनी घेतल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासादरम्यान समस्या निर्माण झाल्या आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने बस बंद करण्याचा निर्णय ( घेतल्यामुळे ग्रामीण भागातील शहरी भागाशी जोडली गेलेली नाळ एक प्रकारे तुटली गेली आहे. माघील काळामध्ये  पीएमपीएल बस सुविधा सुरू झाल्याने शहरी भागात प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध झाल्या होत्या यामुळे नागरिकांचा वाया जाणारा वेळ आणि गाड्या बदलून इतर ठिकाणी प्रवास करून येणारा खर्च वाचत होता.
टाकवे बुद्रुक वडेश्वर जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष रोहिदास असवले म्हणाले,”
ग्रामीण भागातील नागरिक इतरत्र काही कामानिमित्त तसेच महिला शहरी भागात घर काम किंवा इतर कामानिमित्त जात असतात रात्रीच्या वेळी ग्रामीण भागात परतताना प्रवासादरम्यान काही साधन उपलब्ध नसते. परंतु पीएमपीएल बस मुळे रात्रीच्या वेळी महिलांसाठी सुरक्षितेच्या दृष्टीने पीएमपीएल बस अतिशय महत्त्वाचे साधन होते.परिणामी या सर्व गोष्टींचा विचार करून लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून ग्रामीण भागात  पी एम पी एल बस सुविधा  पुन्हा पूर्ववत सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विद्यार्थी, महिला ,वयोवृद्ध वर्ग, दुग्ध व्यवसाय, शेतकरी कामगार इतर सर्वांनी केली आहे.
विद्यार्थिनी निलम गायकवाड म्हणाली,”
आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागात शिक्षण घेण्यासाठी जात असताना  सकाळच्या वेळी पीएमपीएल बस उपलब्ध होत असल्यामुळे कॉलेज शाळेच्या ठिकाणी वेळेवरती पोहोचता येत होते. आता आम्हाला वाहने बदलत जावे लागते.
कामगार नवनाथ भोसले म्हणाले,”
औद्योगिक वसाहत कंपनीच्या वेळेमध्ये  तीन शिप सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी बस उपलब्ध होत असल्यामुळे कामावरती नित्यनेमाने जाणे येणे व प्रवासादरम्यान खर्च वाचत होता. प्रामुख्याने सकाळी व रात्रीच्या वेळी  पी एम पी एल बसमुळे खूप मोठा आधार उपलब्ध झाला होता.

error: Content is protected !!