वडगाव मावळ:
जागतिक एड्स दिवसाचे औचित्य साधून स्माईल व्यसनमुक्ती केंद्र, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी,मायमर मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा उर्से येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
जागतिक एड्स दिनानिमित्त स्माईल व्यसनमुक्ती केंद्र येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी व आय सी टी सी सेंटर मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे यांचे सहकार्य लाभले.
  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक अध्यक्ष  विलास काळोखे उपस्थित होते. तसेच स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष हर्षल पंडित, रो. सुरेश शेंडे, सेक्रेटरी रोटरी क्लब रो. संजय मेहता, आय सी टी सी सेंटर मायमर मेडिकल कॉलेजच्या प्रमुख सल्लगार सौ. शुभांगी कदम व लॅब प्रमुख श्री. जितेंद्र धनगावन हे उपस्थित होते.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे प्रणव देशमुख, श्री. नितिन नाटेकर, श्री. हर्षल जोशी, श्री. प्रकाश धिडे, श्री. शितल आठल्ये व सर्व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.५० सहभाग्यांनी स्व इच्छेने आपली तपासणी ही करुन घेतली.

error: Content is protected !!