जिजाऊ ब्रिगेडच्या मावळ तालुका अध्यक्षपदी सिद्धी सावले
तळेगाव दाभाडे :
मावळ तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षपदी सिद्धी सौरभ सावले यांची एकमताने निवड करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे व पुणे जिल्हाध्यक्ष जयश्री गटकुळ यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
शैक्षणिक सामाजिक तसेच विधायक कार्य करणाऱ्या सिद्धी यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने जिजाऊ ब्रिगेडच्या तालुक्यातील कार्याला मोठी गती मिळणार आहे. समाजातील नारीशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच जिजाऊ ब्रिगेड महिला संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सावले यांनी सांगितले.

error: Content is protected !!