टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ भागातील पारिठेवाडी येथे  सालाबाद प्रमाणे दत्त जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन गावातील नागरिकांच्या वतीने होत असते यानिमित्ताने पंगतिच्या जेवणासाठी लागणारे सर्व साहित्याची मागणी गावातील ग्रामस्थांनी टाकवे गावचे माजी उपसरपंच व  टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष  रोहिदास नाना असवले यांच्याकडे मागणी केली असता  उपसरपंच रोहिदास असवले यांनी दिलेला शब्द पाळत त्यांची मागणी पूर्ण करत पारिठेवाडी येथील मंदिरात जाऊन गावातील ग्रामस्थांना पंगतिचे साहित्य सुपूर्त केले.
यावेळी गावातील नागरिकांनी रोहिदास असवले यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करून सन्मानित केले.  तसेच त्यांच्याबरोबर असणारे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा गावातील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रम प्रसंगी तुकाराम कोद्रे, बाळासाहेब उर्फ चिकू वायकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास जांभुळकर, दत्तात्रय असवले, किरण साबळे, काशिनाथ जांभुळकर मुन्नावर आत्तार, विकास असवले, शंकर असवले, काळूराम घोजगे, साहेबराव आंबेकर,संतोष कोंडे सोमनाथ असवले, उपसरपंच कोंडीवडे रवींद्र तलावडे, नवनाथ भोईरकर, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पाठारे, तसेच गावातील नागरिक रवि शिंदे ( उपाध्यक्ष भाजपा सोशल मिडिया मावळ तालुका)नारायण पांगारे
संचित पारिठे,भरत जोरी, बाळू पारिठे,राघू तळपे,सोनबा करांडे, मयूर पारिठे,वैभव पारिठे,रंगनाथ सावंत, आण्णा करांडे,यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!