वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील वडगाव जांभूळ मार्गे असणारे जांभूळ रेल्वे गेट क्र. ४७ येथील भुयारी मार्गाचे काम गेल्या एक वर्षांपासून संथ गतीने चालू आहे. ते काम तात्काळ पुर्ण करत मार्ग वाहतुकीसाठी खुला करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राजु शिंदे, दत्ता घोजगे, एकविरा कृती समिती भरत मोरे, नंदकुमार पदमुले, गुलाब तिकोणे यांनी दिला आहे. रेल्वेच्या पुणे विभागाच्या मुख्य अभियांत्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
जांभूळ येथील भुयारी मार्गाचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे परिसरातील ५० गावातील नागरिकांना दळणवळणासाठी खूप अडचण येत आहे. या परिसरात अनेक छोटे मोठे उद्योग व्यावसाय व कारखानदारी आहे. तसेच विद्यार्थी, कामगार, शेतकरी यांना या मार्गाने जावे लागते. नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सध्या कान्हे गेट क्रमांक ४५ वरून पाच किलो मीटरचा वळसा घालावा लागत आहे. तसेच गेट क्रमांक ४५ वर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने दोन – दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. दोन मिनिटाचा रस्त्या पासकरण्यासाठी रेल्वे मार्गावरून रेल्वे पास होत असताना पाठक बंद झाल्यानंतर वाहतूक कोंडीमुळे तब्बल मोजावे लागतात दोन ते अडीच तास त्यामध्ये रुग्णवाहिका, विद्यार्थी, कामगार यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. येत्या पंधरा दिवसात गेट क्रमांक ४७ भुयारी मार्गाचे काम करावे व तो वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे.
सोमनाथ कोंडे म्हणाले,”
येथील भुयारी मार्गाचे काम अतिशय संत गतीने सुरू आहे. परिणामी आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटी पासून वडगाव पर्यंत शाळेचे अंतर किमान दोन किलोमीटर आहे. परंतु येथील भुयारी मार्गाचे काम संत गतीने सुरू असल्याकारणाने जांभूळ, मुख्य रस्ता महिंद्रा कंपनी, कान्हे फाटा, साते, मोहितेवाडी, ब्राह्मणवाडी, वडगाव असा वळसा घालून शाळेच्या ठिकाणी मुलांना घेऊन पोहोचावे लागत आहे. दररोज मुलांना शाळेत ने आण करण्यासाठी खूप वेळ देखील वाया जात आहे, तसेच गाडीचा खर्च परवडत नाही त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडत आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी यामध्ये लक्ष केंद्रित करून रेल्वे विभागाने जलद गतीने कामास सुरुवात करावी अशा सूचना संबंधित विभागाला कराव्यात होणाऱ्या समस्येचे तत्काळ निवारण करावे.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष बाबाजी गायकवाड म्हणाले,” टाकवे बुद्रुक येथील कंपन्यांमधून चाकण येथील एमआयडीसी मध्ये आमच्या ट्रान्सपोर्ट मार्फत इतर कंपन्यांना असेंबली साठी काही पार्ट जात असतात. दरम्यान कान्हे फाटा या भागातून वळसा घालून जाव लागत आहे. परिणामी कंपन्यांना वेळेवरती माल पोहोचत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.या होणाऱ्या सर्व परिणामांचा आर्थिक भुर्दड देखील सोसावा लागत आहे.
टाकवे नाणे जिल्हा परिषद भाजपा गट अध्यक्ष रोहिदास असवले म्हणाले,”
मागील गेल्या 13 महिन्यापूर्वी कामाला सुरुवात झाली होती. मात्र पावसाळ्यामध्ये काम बंद होते तसेच आता काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. परिणामी शाळेतील विद्यार्थी,व्यवसायिक कामगार वर्ग या भागात राहणारे नागरिक, तसेच आंदर मावळ मधून 60 ते 70 गावांचे प्रवास करणारे प्रवासी यांना जांभुळ येथील गेट नंबर 47 बंद असल्यामुळे खूप मोठा भुर्दड भोगावा लागत आहे, या सर्व बाबींचा विचार करून तत्काळ भुयारी मार्गाचे काम करून सुरू करावा.
माजी जिल्हा परिषद सदस्य भरत मोरे म्हणाले,”
कामशेत रेल्वे गट नं. ४२ च्या भुयारी मार्गाचे आपण चुकीच्या पद्धतीने केले असून ते २० गावातील शेतक-यांच्या कामगार, विद्यार्थी, दुध व्यवसायीकांच्या उपयोगाचे नसून गेली २ वर्षांपासून या भुयारी कामाच्या मार्गात पाणी साचल्यामुळे त्याचा वाहतुकीसाठी उपयोग होत नाही. अशा चुकीच्या पद्धतीत होणाऱ्या कामांना आळा घातला पाहिजेल व नागरिकांना वेटीस धरणे आपल्या मार्फत थांबले गेले पाहिजे.
माजी सरपंच संतोष जांभुळकर म्हणाले,”
जांभूळ गावातून वडगावला जाण्यासाठी दोन किलोमीटरचे अंतर आहे. भुयारी मार्गाचे काम सुरू असल्यामुळे जांभुळ येथील गेट नं. 47 बंद आहे. तसेच एक दोन महिन्यांमधून कान्हे फाटा येथील 45 गेट नंबर काही दुरुस्तीच्या कारणास्तव एक किंवा दोन दिवस बंद राहत असते. परिणामी शहरी भागात जाण्याचे सर्वच मार्ग आम्हाला बंद होत असतात त्यामुळे आम्हाला दोन किलोमीटरच्या अंतरासाठी तब्बल 100 ते 120 किलोमीटरचे अंतर मोजावे लागत आहे. या समस्येची रेल्वे प्रशासन व खासदार श्रीरंग बारणे यांनी तात्काळ दखल घेऊन नागरिकांच्या समस्यांचे जलद गतीने निवारण करावे. अन्यथा येत्या पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणावरती आंदोलन उभारून होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील.