तर भामा- आसखेड धरणग्रस्त आंदोलक शेतकरी मंत्रालया समोर आत्मदहन करतील
मुंबई:
भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळालाच पाहीजे.. यासाठी दिनांक १४/११/२०२२ पासून धरणग्रस्त शेतकरी व त्यांचे कुटुंबीयांनी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा पंधरावा दिवस.
सरकार व संबधीत अधिकारी यांचे कडून अद्याप पर्यंत आंदोलनाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. शासकीय अधिकारी फक्त आश्वासन देत आहेत आमचा शासकीय अधिकारी त्यांचे आश्वासनावर विश्वास नाही. अशी आश्वासने गेली चार वर्ष ते धरणग्रस्तांना देत आहेत. त्या मुळे त्यांच्या आश्वासनाला काही किंम्मत नाही जो पर्यंत पर्यायी जमिन देऊन ७/१२ संबधीत धरणग्रस्त शेतकरी यांचे नावावर होत नाही तो पर्यंत हे आंदोलन चालू राहील असा इशारा अंदोलनकर्त्यांनी दिला.
सरकार या आंदोलनाची दखल घेणार नसेल तर आंदोलन अजुन तिव्र केले जाईल. वेळ प्रसंगी मंत्रालया समोर आंदोलकां कडून आत्मदहन ही केले जावू शकते ? आंदोलन तिव्र झाल्या नंतर त्यातुंन काही अघटित घडले तर त्यास आंदोलक नाही तर सरकार जबाबदार असेल ? तेव्हा सरकारने भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकर्यांनचे प्रश्न तातडीने सोडवावे.
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या खासील प्रमाणे आहे.
१) उच्च न्यायलयाच्या आदेशा नुसार ६५% रक्कम भरलेल्या प्रकल्प ग्रस्तांना तातडीने पर्यायी जमिनीचे वाटप करण्यात यावे.
२) संकलन दुरूस्ती करणे बाबत या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत तर आंदोलकांना मंत्रालया समोर आत्मदहना शिवाय पर्याय नाही असे अंदोलनकर्त्यानी सरकारला सुनावले आहे.

error: Content is protected !!