रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी ने आरोग्य क्षेत्रामध्ये मोठे योगदान द्यावे: माजी मंत्री बाळा भेगडे
तळेगाव दाभाडे:
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व उडान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शिबिरामध्ये 126 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. 36 रुग्णांना मोतीबंदू असल्याचे निदान झाले. त्यांची शस्त्रक्रिया आठ दिवसात पार पाडण्यात येणार आहे.
मेडिकल एज्युकेशन महाराष्ट्राचे सहसंचालक डॉ.अजय चंदनवाले, रो दिलीप पारेख,रो जयंत देशपांडे, नगरसेविका शोभाताई भेगडे,डॉ सतीश शितोळे,रोटरी सिटी चा उपाध्यक्ष रो शहीन शेख,रो रेश्मा फडतरे,रो शरयू देवळे  पस्थितहोते.
माजी मंत्री बाळा भेगडे यांनी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी करत असलेल्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवउद्गार काढले.रोटरी क्लब ने पुढाकार घेऊन गोरगरीब,दिन दुबळ्या लोकांची सेवा करण्यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून द्यावे व गोरगरिबांची सेवा करावी असे आवाहन केले.
डॉ.अजय चंदनवाले यांनी रोटरी क्लब उडान फाऊंडेनने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून रोटरी क्लब ला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.नितीन मराठे यांनी रोटरी क्लब व उडान फाऊडेशनने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध कराव्यात व वेगवेगळ्या अत्याधुनिक उपकरणे या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
क्लबचे अध्यक्ष दीपक फल्ले यांनी रोटरी क्लब सिटी निश्चितच आरोग्य क्षेत्रामध्ये आपणा सर्वांच्या सहकार्याने सुंदर असे उपक्रम राबवेल अशी अशा व्यक्त केले.
उडान फाउंडेशनच्या अध्यक्ष भाग्यश्री ठाकूर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध सुविधा उपलब्ध करणे विषयी उडान फाउंडेशनच्या माध्यमातून निश्चितच योग्य कृती केली जाईल असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख किरण ओसवाल यांनी केले तर आभार प्रदीप टेकवडे यांनी मानले.कार्यक्रमाचे नियोजन प्रशांत आगलावे,चेतन ओसवाल,विश्वास कदम,रघुनाथ कश्यप,हर्षल पंडित,प्रदीप मुंगसे,प्रसाद पादीर,प्रसाद बानगुडे,तानाजी मराठे,संजय मेहता,राकेश ओसवाल व चेतन पटवा  यांनी केले.

error: Content is protected !!