सत्ताधारी यांचे आदेशाने, रस्त्याची दिशा व रुंदी बदलू नये  वडगाव मावळ :
मागील एक वर्षापासून काम चालू असलेल्या वडगाव बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या कामाला विलंब होत असल्याने तसेच त्यामुळे नित्याची झालेली वाहतूक कोंडी व नागरीकांची गैरसोय यामुळेच नागरिक त्रस्त झालेले असताना सध्या आपण वडगाव नगरपंचायतमधील सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यानुसार रस्त्याची दिशा व रुंदी ठरविण्याचा घाट घातला आहे.कुणाच्याही सांगण्यानुसार व त्यांच्या सोयीनुसार तुम्ही पुढे रेटत असलेल्या कामाचा आम्ही जाहीर निषेध करतो.
     श्री खंडोबा मंदीरापासून श्री महादेव मंदीरासमोरील कोपऱ्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामाची आखणी करताना व प्रत्यक्ष काम करताना ठिकठिकाणी आपण हेतुपुरस्सर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घर व दुकानासमोरील ओटे वाचविण्यासाठी त्यांच्याच समोरील बाजूस असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या घराच्या व दुकानाच्या थेट उंबऱ्यावर देखील हातोडा टाकला आहे.सदर रस्त्याचे बांधकाम पुर्णत्वास नेत असताना आपण करत असलेले काम मनमानी व एका बाजूला झुकत्या स्वरुपाचे आहे.या रस्त्याच्या कामात सर्वांना समान नियम लागू होणे अपेक्षित असताना नगरपंचायत मधील सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यानुसार चालू असलेले काम अत्यंत चुकीचे आहे.
      यापुढील रस्त्याचे बांधकाम करताना बाजारपेठेमध्ये ठरलेल्या रुंदीनुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली घरे किंवा दुकाने यांना समसमान नियम लावावा.मोकळी जागा आणि नगरपंचायत मधील सत्ताधारी यांच्या सोयीनुसार रस्त्याची दिशा व रुंदीमध्ये बदल करु नये. वडगाव मधील रोड चे बाजूला आसलेले व्यवसायिक व नागरिक यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा अन्यायी व एककल्ली पद्धतीने चालू असलेले रस्त्याचे काम वडगाव शहर भाजपाच्या वतीने तत्काळ थांबविण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
याप्रसंगी मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, गटनेते दिनेश ढोरे, मा प्रभारी सरपंच संभाजी म्हाळसकर,वडगाव भाजपा कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, संघटन मंत्री किरण भिलारे, नगरसेवक किरण म्हाळसकर, ऍड विजयराव जाधव,भूषण मुथा, संतोषनाना म्हाळसकर,सरचिटणीस कल्पेश भोंडवे, मकरंद बवरे, रविंद्र म्हाळसकर, शरद मोरे, हरीश दानवे, संतोष  द.म्हाळसकर उपस्थित होते.

You missed

error: Content is protected !!