तळेगाव  दाभाडे:
    साठी पार पाडलेल्या 48 वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी स्तुत्य उपक्रम राबवल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
           सन 1974 – 75 या वर्षी इयत्ता अकरावी मध्ये असलेल्या नूतन विद्या मंदिर (सध्याची अँड.पु.वा. परांजपे विद्या मंदिर) या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातील विद्यार्थी विनयचंद्र दिघे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्योगधाम येथील शाळेला रुपये पाच हजारचा धनादेश व तेलाचा डबा उद्योगधाम संस्थेचे विश्वस्त सुरेश झेंड,व उर्मिला बासरकरयाना दिला.
तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना मदत व्हावी या दृष्टीने मायमर रुग्णालयामध्ये रुपये दहा हजाराचा धनादेश संस्थेचे संचालक डॉ. कामत याना देऊन आपल्या सामाजिक बांधिलकीची उतराई केली.मागील वर्षी वयाची साठी पार केलेल्या या ग्रुपमधील विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते.
या ग्रुपमधील श्री मुकुंद करंदीकर यांचे निधन झाले. त्यांचे स्मृतिपित्यर्थ ग्रुपकडून नूतन विद्या मंदिर (सध्याची अँड.पु.वा. परांजपे विद्या मंदिर) मधील इयत्ता दहावी मध्ये प्रथम व दितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपये कायम रक्कम संस्थेच्या सोसायटीमध्ये जमा केली. व तिच्यावरनं येणाऱ्या व्याजामधून कायमस्वरूपी इ. दहावीमध्ये  प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्याला बक्षीस देण्याचं नियोजन केलं आहे.
        मागील वर्षानंतर आज तगायत ग्रुपमधील साठी पार केलेल्या ज्या ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस होतात. त्या त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याचा सन्मान करून त्याला प्रोत्साहन दिलं जातं. हा उपक्रम कायम राबवला जात आहे.
       श्री विनयचंद्र दिघे यांचे आई-वडील यांनी या अगोदर देहदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच विद्यार्थी विनयचंद्र दिघे यांनी या आगोदर नेत्रदानचा फॉर्म भरला आहेच तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने देहदान करण्याचा फार्म भरून आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकले आहे.
        या कार्यक्रमास ग्रुपचे विद्यार्थी पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस अविनाश बवरे, तळेगाव दाभाडे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष मनोहर दाभाडे, तळेगाव शहर आर पी आय चे माजी अध्यक्ष तानाजी गडकर, सोमाकांत टकले, गोरख बुटे, मधुसूदन खळदे, रमेश डोळे, नंदकुमार कर्णिक, प्रदीप जव्हेरी, सखाराम जगताप, दीपक वाडेकर, तानाजी सावंत  उपस्थित होते.
 या कार्यक्रमात स्वागत मनोहर दाभाडे यांनी केले. धनादेश प्रदान व शुभेच्छा बबनराव भेगडे, अविनाश बवरे सह सर्व उपस्थित मान्यवरांनी केला. अभार सोमाकांत टकले, मधुसूदन खळदे यांनी आभार मानले.
 

error: Content is protected !!