नऊ ग्रामपंचायतीसाठी ७६ जण रिंगणात: सदस्यपदाचे ४४ जण बिनविरोध
वडगाव मावळ :
  मावळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण सदस्यपदाचे ४४ उमेदवार बिनविरोध, तर ३६ जागांसाठी ७६ उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपदाच्या ८ जागांसाठी २४ उमेदवार रिंगणात आहेत. शिरगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे.
बिनविरोध उमेदवार पुढीलप्रमाणे शिरगाव सरपंचपदासाठी प्रवीण गोपाळे, सदस्य योगीता वाघमारे, पूजा गोपाळे, श्रीधर गोपाळे, संध्या गायकवाड, समीर अरगडे, रोहिणी गोपाळे, स्वप्नील अरगडे, अक्षय सहादू गोपाळे, तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, राक्षे, ए. एम. लिमये, मधुकर पवार यांनी काम पाहिले.
सावळा सरपंच पदासाठी मनीषा आढारी, मंगल ढोंगे तर सदस्यपदासाठी स्वप्निल सुपे, जानकू वडेकर,तुकाराम बडेकर, पूजा कालेकर, चिमाबाई ताते, जालिंदर भोईर असे सहाजण रिंगणात असून एक जागा रिक्त राहिली आहे.
वरसोली सरपंचपदासाठी बबन बुवा खरात, संजय बबन खांडेभर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.तर सदस्यपदासाठी मंदा नामदेव पाटकर, मीना पांडू शिंदे, सीता गंगाराम ठोंबरे, राहुल मारुती सुतार हे बिनविरोध झाले असून, तुकाराम भगवान होले, विजय बाबू महाडिक, नारायण राजाराम कुटे, हनुमंत वसंत शेलार, रजनी राजू शेलार, प्रियंका संभाजी शेलार, गंगाराम बाळू मरगळे, अरविंद अशोक बालगुडे, सोनाली रामदास खांडेभरड, नलिनी दत्ता खांडेभरड हे उमेदवार रिंगणात आहेत.
गोडुंब्रे येथे सरपंचपदासाठी प्रियंका चोरघे, कल्पना सावंत, नीशा सावंत, मोहिनी कदम हे चारजण तसेच सदस्य पदासाठी सतीश सावंत, किरण येवले, नीलेश सावंत, किरण सावंत, अर्चना सावंत, सुकन्या चोरघे, प्रदीप सावंत, गौरव चोरघे हे उमेदवार रिंगणात आहेत तर प्रियंका आगळे, छाया सावंत, शकुंतला कदम हे तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
निगडे सरपंचपदासाठी पदासाठी भिकाजी भागवत, संदेश शेलार हे दोघेजण रिंगणात असून सदस्य पदासाठी रुक्मिणी चव्हाण, मंगल भागवत, भगवान ठाकर, ज्ञानेश्वर ठाकर, योगेश थरकुडे, संदीप चव्हाण, मनीषा ठाकर, मनीषा लोटे, शलाका साळवे, रोशनी साळवे, चंद्रकांत करपे, शंकर भांगरे, भागाबाई ठाकर, जयश्री हेगाडे, आरती भांगरे, राजश्री खेंगले, गणेश भांगरे, सोमनाथ भांगरे असे अठरा उमेदवार रिंगणात आहेत.
कुणेत सरपंचपदासाठी सुरेख संदीप उंबरे, राणी सुनील भोरडे, रेश्मा दत्ता जाधव, नलिनी यशवंत उघडे हे चार उमेदवार तर सदस्यपदासाठी संदीप वसंत उंबरे, सागर मधुकर उंबरे, भारती राजेंद्र पिंगळे, संगीता नारायण पिंगळे, मनीषा संजय ढाकोळ, बेबी चंदकांत खांडेभरड, संगम संजय वरे, भरत कैलास पिंगळे, सुरेश पटू होले, रामदास सुरेश लांडगे, अशोक दत्तू गोजे, शिवाजी शंकर लांडगे, कमल वाघमारे, रेश्मा वाघमारे, अश्विनी वाघमारे, रेश्मा भिवडे, जोस्मिन वाघमारे, संजय ढाकोळ, रामदार शेलार हे १९ उमेदवार रिंगणात आहेत तर कलावती उघडे यांची बिनविरोध निवड झाली.
भोयरे सरपंच पदासाठी वर्षा भोईरकर, रोहिणी अडीवळे, सुरेखा भोईरकर तर सदस्यपदासाठी ऋषिकेश खुरसुले, पांडुरंग भोईरकर, नितीन अडीवळे, बाळू भोईरकर, संगीता वाघमारे, सोनाली पवार, नितीन भोईरकर, भारत भोईरकर, ऊर्मिला भोईरकर, रंजना भोईरकर, योगीता डोळस, गणेश दमामे, रामदास भोईरकर असे १३ उमेदवार रिंगणात तर दीपाली जांभूळकर यांची निवड झाली आहे.
इंदोरी सरपंचपदासाठी तीन उमेदवार रिंगणात अंकुश दतात्रय ढोरे, मधुकर दिनकर ढोरे, शशिकांत राजाराम शिंदे, बिनविरोध निवड झालेले सदस्य बेबीताई मनोज बैकर, सपना योगेश चव्हाण, मुकेश रमेश शिंदे, सुरेखा सुदाम शेवकर, नीलिमा प्रदीप काशीद, धनश्री सचिन काशिद, शिवराम दतात्रय ढोरे, संदीप बालू ढोरे, लतिका नीलेश शेवकर, मधुकर पोपट शिंदे, संदीप सखाराम नाटक, स्वप्नील मधुकर शेवकर, राजश्री प्रवीण राऊत, बाळकृष्ण राणू पानसरे, रेश्मा संतोष शिंदे, विनोद उद्भव भागवत, जयश्री गोरख सावंत.

error: Content is protected !!