मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन विशेष:
मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबर भेगडे अनंतात विलीन झाले. हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी दादांना अखेरचा निरोप दिला.भेगडे कुटुंबिय, आप्तेष्ट, नातेवाईक जितके शोक सागरात बुडाले तितकासा शोक मावळच्या सर्वसामान्य जनतेला आहे.
माजी आमदार दिगंबर दादा भेगडे यांच्या निधनाचे वृत्त तालुक्यात वा-या सारखे पसरले आणि दादांच्या गतकाळातील आठवणींना खेडोपाडी उजाळा मिळू लागला  सोशल मिडिया वर ही नेटक-यांनी दादांना श्रद्धांजली वाहिली.
व्हॅटसचे स्टेट्स असो की फेसबुक पेजवर दादांच्या श्रद्धांजलीच्या शेकडोंच्या संख्येने पोस्ट्स फिरू लागल्या.ज्याला या घटनेची माहिती मिळेल तो कार्यकर्ता, नेता, पदाधिकारी कुंडमळयाच्या दिशेने रवाना झाला.तत्पूर्वी भाजपाच्या वडगाव मावळ येथील पक्ष कार्यालयात माजी आमदार दिगंबर दादा भेगडे यांचे पार्थिव अंत:दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार विलास लांडे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर , माजी सरपंच सोपानराव म्हाळस्कर, माजी  उपसभापती प्रविण चव्हाण, टाकवे बुद्रुक जिल्हा परिषद गट भाजपाचे अध्यक्ष रोहीदास असवले,खरेदी विक्री संघाचे संचालक मारुती खांडभोर यांच्या अन्य भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वडगाव च्या पक्ष कार्यालयात दादांचे दर्शन घेतले. यावेळी सर्वाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.
पंचवीस वर्षे मावळ तालुक्यावर भाजपाची एकहाती सत्ता होती. श्रीमती रूपरेखा ढोरे भाजपाच्या आमदार झाल्या, त्यांच्या नंतर दिगंबर दादा भेगडे यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली.बाळाभाऊ भेगडे यांनीही मावळचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केले. वडगाव मावळ च्या पक्ष कार्यालयात दिगंबर दादांचे अखेर दर्शन घेतल्यावर अनेक भाजपच्या मंडळीनी दादांचा गतकाळ सांगितला.
कोणी सांगत होते दादा हाडाचे शेतकरी, शेतीवर त्यांची प्रचंड श्रद्धा. काळ्या आईची सेवा करण्यात ते रममाण असायचे. कोणी त्यांच्या बैलगाडा शर्यतीच्या उत्साहाला दाद दिली. तरी कोणी दादा म्हणजे, पंढरीचे वारकरी आणि विधानसभेचे मानकरी ही बिरुदावली सांगितली.दादांचा राजकीय प्रवास हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा होतो असाच झाला.असे ही सांगण्यात आला 
दादा,  इंदोरी ग्रामपंचायतीचे सदस्य होते, उपसरपंच झाले. येथून सुरू झालेला दादांचा राजकीय प्रवास विधानसभेचे सदस्य इथपर्यंत झाला.
  गावचे उपसरपंच म्हणून दिगंबर भेगडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सदस्य, मावळ तालुका पंचायत समितीचे उपसभापती, भाजपाचे-जिल्हाध्यक्ष आणि दोन वेळा मावळ तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले.
  दिगंबर भेगडे हे मावळ मतदारसंघातून भाजपाच्या कमळ चिन्हावर १९९९ व २००४ या  निवडणुकीत निवडून आले होते.मातब्बर मंडळींचा पराभव करून दादा, विधीमंडळात पोहचले पण त्यांना राजकारणाची नशा कधीच भिनली नाही. अत्यंत शांत, संयमी आणि मितभाषी असे त्यांचे नेतृत्व. भाजपात त्यांचा दबदबा होताच. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्याशी जसा त्यांचा स्नेह होता तसाच स्नेह विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्याशी त्यांचा होता. विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्या कामाचे त्यांनी जाहीर पणे कौतुक केले आहे.
  माजी आमदार दिगंबर दादा भेगडे राजकारणात जितके लोकप्रिय व समाजाभिमुख होते, तितकेसे कुटुंबवत्सल होते. राजकारणातील चढउतार त्यांनी सहजतेने घेतले तसेच कौटुंबिक सुख दु:खाला सहजतेने हाताळले. शेवटी  ऐवढेचे म्हणावे लागले,पंढरीचे वारकरी ते विधानसभेचे मानकरी ही बिरुदावली दादांना शेवटपर्यंत चिटकून राहीली. ते असतानाही आणि ते अनंतात विलीन झाल्यानंतर ही.
 

error: Content is protected !!