शिवणे येथील मंडल अधिकाऱ्यास वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक.
वडगाव मावळ :
पवन मावळातील शिवणे येथील मंडल अधिकाऱ्यास २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. ६) दुपारी अटक केली आहे.
मंडल अधिकारी संगीता राजेंद्र शेरकर व खाजगी व्यक्ती संभाजी लोहोर असे कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, यातील तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या भडवली (तालुका मावळ) येथील जमिनीच्या ७ / १२ उताऱ्यावर त्यांचे नाव लावण्याकरिता मंडल अधिकारी संगीता शेरकर व संभाजी लोहोर यांनी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
या संदर्भात तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर त्यांनी शुक्रवारी (दि. २) पडताळणी करून मंगळवारी (दि. ६) २० हजार रुपयांची लाच मंडल अधिकारी संगीता शेरकर यानी आढले बुद्रुक तलाठी कार्यालय तालुका मावळ येथे स्वीकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस हवालदार पौर्णिमा साका, पोलीस शिपाई सौरभ महाशब्दे, चालक पोलिस हवालदार – दीपक दिवेकर यांच्या पथकाने केली आहे.

error: Content is protected !!