वडगाव मावळ :
कोयत्याने वार करणा-या आरोपीस वडगाव मावळ पोलीसांनी अटक केली आहे भांडणाचा राग मनात धरून आरोपीने कोयत्याने एकाच्या डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्या आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे.
  गुरुवारी ता.१ला  दुपारी  हिंदवी चायनीज सेंटर वडेश्वर ता. मावळ जि. पुणे येथे ही  घटना  घडली.गणेश गणपत शिंदे (वय २९  रा. नागाथली ता. मावळ जि पुणे) असेया  आरोपीचे नाव आहे.
संदीप ज्ञानेश्वर तिकोणे (वय 28, रा. नागथली ता. मावळ जि पुणे) असे जखमी झालेल्या॔चे नाव असून त्यांनी पोलीसात फिर्याद दाखल केली.
पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार,” संदीप तिकोणे हे त्यांच्या हिंदवी चायनीज सेंटर मध्ये जेवण बनवीत असताना, दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी गणेश गणपत शिंदे याने त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादी संदीप तिकोणे यांच्या डोक्यात पाठीमागुन वार करुन फिर्यादी तिकोणे यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
जखमी संदीप तिकोणे वर सोमाटणे तील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
आरोपी  शिंदे हा मुंबईला पळून जात असताना  सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस हवालदार श्रीशैल कंटोळी, शशिकांत खोपडे, संदीप वंडाळे यांनी कर्जत परिसरात लोकलने प्रवास करीत असताना त्याला अटक केली .

error: Content is protected !!