तळेगाव दाभाडे :
लग्न करण्याच्या हेतूने वधुवर सुचक साईटवर संपर्क साधून एका विवाहित व्यावसायिकाची साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिला डाॅक्टरवर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.व्यावसायिक पत्नीच्या सतर्कतेमुळे वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने संबंधितांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय रद्द करुन एकत्र नांदण्यास सुरूवात केली आहे.
  या बाबतची फिर्याद संबंधित व्यावसाईकाने तळेगाव पोलीसात दिली असून, पोलीसांनी डॉ.स्नेहल दत्तात्रय भुजबळ,वय,,३२ रा.मेदनकरवाडी,चाकण,ता.खेड, जिल्हा, पुणे,हिचेवर गुन्हा दाखल केला असून,तीची बॅंक खाती गोठवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.
तळेगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडीत व्यावसायिक तरूण विवाहित असून, प्रापंचिक ताण तनावामूळे पती पत्नी उभयतांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.त्या नंतर व्यावसाईकाने वधू-वर सूचक साईटवर नाव नोंदणी केली होती.अल्पावधीतच त्याला डॉ.स्तेहृल भुजबळ, यांचा प्रतीसाद आला व घटस्फोट प्रलंबीत असतानाही तीच्या नातेवाईकांनी साखरपूडा उरकून घेतला.त्या नंतर व्यावसाईक व डॉक्टर स्नेहल यांचा फोन वर संपर्क सुरू झाला.
दरम्यानच्या काळात डॉक्टर स्नेहल हिने वडील आजारी आहे,ॵषधासाठी, तसेच ऒपीडी किलीनिक सुरू करावयाचे आहे आदि विविध कारणे सांगून व्यावसायिका कडून  परत देण्याच्या बोलीवर वेळोवेळी सुमारे साडेचार लाख रुपये घेतले.
दरम्यान व्यावसायिक घटस्फोट घेण्याच्या तयारीने कागद पत्रांची पुर्तता करण्यासाठी पत्नीची गावी जाऊन भेट घेतली असता खरा प्रकार उघडकीस आला.डाॅ.स्नेहल हिने  घटस्फोट देण्यासाठी तूझ्या कडून २० ते ३० लाख रुपये घे व त्यतील १० लाख रुपये मला दिल्यावरच त्याला घटस्फोट दे असे बजावले असलल्याचे सांगितले असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
तरूणाच्या झालेल्या फसवणुकीबद्दल त्याला न्याय मिळणार का? हे पाहणे औचित्याचे अशा वधूवरसूचक साईड वर जाऊन नोंदणी करू नका ऐवढे मात्र खरे,अन्यथा पैसे ही जाईल,नाव ही जाईल आणि मानसिक त्रास पण वाढेल.

error: Content is protected !!