वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील पोल्ट्री कंपन्यानी आपल्या पोल्ट्री फार्मरचे संवधॅन मूल्यांचे पेमेंट पंधरा दिवसाचे आत देण्यात यावे अशी मागणी मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष केदारी यांचे नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकार्यानी मावळ तालुक्यात असलेल्या पोल्ट्री क॔पन्याच्या व्यवस्थापकांना भेटुन ही मागणी केली.
यावेळी राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशनचे राज्य संघटक सोनबा गोपाळेगुरूजी तालुका पोल्ट्री संघटनेचे सचिव प्रविण शिंदे सहसचिव महेश कुडले तक्रार निवारण समितीचे प्रमुख संभाजी केदारी हे होते.
मावळ तालुक्यातील काही शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणुन पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत. हा व्यवसाय शेतकरी पोल्ट्री कंपन्या बरोबर करार पद्धतीने करीत आहेत. मात्र तालुक्यातील काही कंपन्या या शेतकर्याची अडवूणुक व शोषण करीत आहेत.
कांही कंपन्या फार्मराना पक्षी वेळेवर देत नाहीत. काही कंपन्या पक्षाचे खाद्य वेळेवर आणी चांगल्या दजाॅचे पुरवत नाहीत. तसेच वाढ झालेले पक्षी वेळेवर घेऊन जात नाहीत. काही कंपन्या 50दिवसापर्यंत पक्षी सांभाळायला लावतात.
तर पक्षी नेल्यानंतर30ते45 दिवस पेमेंट करीत नाहीत. त्यामुळे शेतकरी आथिॅक अडचणीत सापडतो. या महत्वाच्या मागण्या कंपन्याच्या व्यवस्थापकांच्या पुढे मांडण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला असुन तालुक्यातील सर्व पोल्ट्री कंपन्यांना लेखी निवेदन देणार आहेत असे संघटनेचे राज्य संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यानी सांगीतले.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित