तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे आधारवड सुरेशभाई लालचंद शहा वय.८८ यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.
तळेगाव दाभाडे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे या ऐतिहासिक संस्थेचे माजी सचिव, खजिनदार,  नगरपालिका मा.नगराध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक,उद्योगधाम संस्थेचे माजी अध्यक्ष, ऐतिहासिक विठ्ठल मंदिर, ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर विश्वस्त, गणेश मोफत वाचनालयाचे विश्वस्त  या विविध सामाजिक संस्थेत विविध पदांवर त्यांनी काम केले व त्यांच्या विकासासाठी अपार कष्ट घेतले म्हणजे प्रत्येक क्षेत्रात भाईंची कामगिरी वाखण्याजोगी होती आणि त्यांचा काम करण्याच्या पद्धती मुळे ते सर्वच क्षेत्रात अग्रेसर होते  वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली.

You missed

error: Content is protected !!