वडगाव मावळ :
मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी भाजप चे बाळासाहेब विष्णू ढोरे यांची बहुमताने तसेच व्हाईस चेअरमन पदी नितीन साळवे यांची बिनविरोध निवड झाली.
वडगाव मावळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात मावळ तालुका सहकारी खरेदी संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी विनोद कोतकर यांनी निवडणुकीचे काम पाहिले.
चेअरमन पदासाठी बाळासाहेब ढोरे व खंडू जाधव यांचे नामनिर्देशन पत्र तर व्हाईस चेअरमन पदासाठी नितीन साळवे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले.
चेअरमन पदासाठी मतदान घेण्यात आली. त्यात बाळासाहेब ढोरे यांना 15 पैकी 9 मते मिळाल्याने खंडू जाधव यांना 6 मते मिळाली. बाळासाहेब ढोरे बहुमताने विजयी झाले तर व्हाईस चेअरमन पदी नितीन साळवे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
16 जागांपैकी 13 जागा राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागा भाजप च्या असताना, भाजपाचा चेअरमन झाल्याने एकच चर्चा रंगली.याप्रसंगी संचालक दत्ता केदारी, बाळासाहेब पवार, पंढरीनाथ ढोरे, दत्ता शिंदे, बाळासाहेब भानुसघरे, मनीषा आंबेकर, भाऊसाहेब मावकर, मारुती खांडभोर, रवींद्र घारे, दत्ता गोसावी, प्रकाश पवार, रोहिदास गराडे, बाळासाहेब ढोरे, नितीन साळवे, खंडू जाधव आदी उपस्थित होते. चंद्रभागा तिकोणे गैरहजर होत्या.
चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब ढोरे यांचा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाब म्हाळसकार, माजी उप सभापती शांताराम कदम, अनंता कुडे, विठ्ठल घारे, किरण राक्षे, यदुनाथ चोरघे, कल्पेश भगत, भूषण मुथा, किरण म्हाळसकर, संभाजी म्हाळसकर बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनियुक्त चेअरमन बाळासाहेब ढोरे म्हणाले मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून तालुक्यात खते, बी, बियाणे विक्री तसेच मावळ चा प्रसिध्द इंद्रायणी तांदूळ महाराष्ट्र राज्यात संघाच्या माध्यमातून वितरण करण्यासाठी पुढाकार घेणार.