लावण्या गायकवाडचे तालुकास्तरीय यश
नवलाखउंब्रे:
यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा महोत्सवात नवलाखउंब्रेतील  लावण्या गायकवाडने तालुकास्तरीय यश मिळवले,तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून तिचे अभिनंदन होत आहे. जि. प. प्राथ. शाळा कोयतेवस्ती, केंद्र नवलाख उंबरे, ता. मावळ शाळेतील  लावण्या मनोहर गायकवाड हिचा ५०  मी.धावणे लहान गटातून प्रथम क्रमांक आला आहे.
मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे  यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्राने सन्मान करण्यात आला.व  तिला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच समस्त ग्रामस्थ नवलाख उंबरे व कोयतेवस्ती तसेच शाळा व्यवस्थान समिती कोयतेवस्ती यांनी लावण्याचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!