मामासाहेब खांडगे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश
तळेगाव स्टेशन:
मामासाहेब खांडगे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तमोत्तम कामगिरी करून यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर झालेल्या फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत द्वितीय स्थान पटकाविले. यामध्ये १७ वर्षे वयोगटाखालील मुले व मुली यांचा समावेश होता.
या स्पर्धा गोवा येथे १३ नोव्हे.ते १५ नोव्हे. या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. याचबरोबर १४ वर्ष वयोगटाखालील मुलांच्या संघानेही उपांत्यपूर्वफेरी पर्यंत मजल मारली.  त्याचबरोबर कु नक्षत्रा मनोहर सोनवणे इ. ९ वी ह्या विद्यार्थिनीने   २२ नोव्हेंबर २०२२ रोजी क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वलवण लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमानाने मावळ तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत  १७ वर्षाखालील वयोगटामध्ये  द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
तसेच कु. हर्षवर्धन गरुड (इ. ६ वी)  या विद्यार्थ्याने सम्राट चषकासाठी खेळण्यात आलेल्या  क्रिकेट वन- डे टूर्नामेंट मध्ये ८ षटकांमध्ये केवळ ३५ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या यासाठी ‘मॅन ऑफ दि मॅच’ म्हणुन कु. हर्षवर्धन ची निवड करण्यात आली.शैक्षणिक क्षेत्राबरोबरच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये मिळालेल्या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 
   यासाठी शाळेचे शारीरिक शिक्षणाचे सर श्री. युनूस पटेल सरानी मार्गदर्शन केले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे  शाळेचे चेअरमन मा.श्री गणेश खांडगे सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व भावी आयुष्यात सुद्धा अशीच कामगिरी करावी यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक ,पालक यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!