वडगाव मावळ:
लायन्स क्लब ऑफ पुणे सेलिब्रेशन्स  यांच्या वतीने आंदर मावळातील आंबळे येथील  १५ विद्यार्थ्यांनीना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले . 
त्यामुळे शिक्षणासाठी रोज ५-६ किलोमीटर पायपीट करणा-या  सावित्रीच्या लेकीची पायपीट थांबणार आहे. या पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी निगडे येथील प्रतिक विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेत आहे. आंबळे,निगडे,खुरसुले तील मुली दररोज या शाळेत येत आहे.कधी एस.टी ने कधी बसने,कधी लिफ्ट मागून तर कधी पायपीट करीत हे विद्यार्थीनी शाळा गाठतात. विद्यार्थ्यांनीची दररोज होणारी पायपीट कमी करण्यासाठी  क्लबचे  माजी झोन चेअरपर्सन  भरत इंगवले व अध्यक्ष गुरुप्रसाद कनोजिया,सचिव दत्तात्रय सपकाळ  यांनी पुढाकार घेऊन सायकलची ही मोठी मदत क्लबच्या सर्व सभासदाच्या मदतीने पार पाडली.
लायन्स क्लब ऑफ पुणे सेलिब्रेशन्स गेली  कित्येक  वर्ष साततयाने ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेणयासाठी सायकल देवून मदत करीत आहे. आजपर्यंत  ३०० सायकल दिले आहे.त्यामुळे या   मदतीबद्दल पालक,शिक्षक व लोकप्रतिनिधींकडून खूप आभार व्यक्त करण्यात येत आहे.सरपंच सविता भांगरे,सरपंच मोहन घोलप यांच्यासह डिस्ट्रिक ३२३४ डी२ चे उपप्रांतपाल-२ ला.सुनील चेकर व लायन्स क्लब ऑफ पुणे सेलिब्रेशनसचे प्रेसिडेंट गुरुप्रसाद कनोजीया क्लबचे संस्थापक शशीभाऊ कदम, खजिनदार धनंजय धुमाळ, माजी अध्यक्ष जितेंद्र ठोंबरे, झोन चेअरपर्सन भरत इंगवले व सायकल  देणगीदार सर्व लायन सभासद ह्या कार्यक्रमास
उपस्थित होते.
हा कार्यक्रम घेण्यासाठी मावळ भागातील रामदास वाडेकर ह्याचे खूप मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक उत्तम मांडे व शिक्षक शशिकांत कोळेकर यांनी नियोजन केले.

You missed

error: Content is protected !!