प्रतापगडाप्रमाणे लोहगडावरील अतिक्रमण हटवावे ; शिवभक्तांची मागणी
सुभाष भोते
कामशेत :
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पवन मावळात असलेल्या लोहगड किल्ला प्रसिद्ध असलेला गड आहे. या गडावर राज्यभरासह देश विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र लोहगडावर गेल्या काही वर्षांपासून दर्ग्याचे,कबरींचे व त्याच्या चौहुबाजूला गडावरती अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. व अतिक्रमाणावर कारवाई कधी होणार आहे. असा सवाल इतिहास प्रेमी तसेच शिवभक्तांनी केला आहे.
अनेक हिंदू संघटना, इतिहास प्रेमी, व शिवभक्तांनी एकत्र येऊन हे अतिक्रमण हटवावे या संदर्भात वारंवार आवाज उठवला आहे.मात्र पुरत्व विभागाने याची दखल मात्र घेतलेली नाही. तसेच लोहगड किल्ल्यावरती दर्ग्याच्या बाजूला जत्रा भरली जात होती. या जत्रेच्या काळात  दिवस-रात्र किल्ल्याचे दरवाजे उघडे ठेवले जात असे. या जत्रेच्या काळात गडावर मोठ्या संख्येने या लोक  लोहगडावरती उपस्थित राहत असता या जत्रेमुळे कचरा, घाण, पिण्याचे पाणी अशुद्ध होते. या मुळे गडाचे पावित्र्य राखले जात नव्हते. या संदर्भात बातम्या आल्यानंतर तसेच शिवभक्तांनी मोठ्या संख्येने विरोध केल्या नंतर पुरात्व विभागाने याची दखल घेत गडावरील हा प्रकारावर काही निर्बंध घालण्यात आले आहे. तसेच लवकरात या अतिक्रमना बाबत पुरातत्व विभागाने याची दखल घ्यावी अशी मागणी नागरकांनी केली आहे.
या अतिक्रमना संदर्भात विविध  संघटनांनी या बाबत पूरात्व विभागाला माहिती दिली असून पुरातत्त्व विभाग या संदर्भात कोणतेच पाऊल उचलत नसल्याचे दिसून येत आहे. या दर्ग्या संदर्भात इतिहात कसलाच उल्लेख नाही. असे इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे. तसेच या दर्ग्यात ठिकाणी  कबरी दिसून येत आहेत. आत्ता या कबरी आल्या कुठून असा प्रश्न शिवभक्तांना पडला आहे. जशी कारवाई प्रतागडावर झाली तशी ही कारवाई लोहगडावर व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. आणि जर लवकरात लवकर या वर कारवाई झाली नाही तर शिवभक्तांनी जन आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पुरात्च विभाग या कडे कश्या प्रकारे पाहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पुरातत्व विभागाचे गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष
लोहगड किल्ल्यावरती पुरातत्त्व विभागाचे अधिकारी असून त्या ठिकाणी किल्ल्यावरती जाण्यासाठी तिकीट आकारले जाते परंतु लोहगड किल्ल्यावरती पर्यटकांसाठी कोणत्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत स्वच्छतागृह नाहीत तटबंदीच्या कडेला जे लोखंडी रोड लावले आहेत तेही तुटलेले आहेत दिशा फलकही नाहीत.
किल्ल्यावरती असलेल्या दर्ग्यातील अतिक्रमणात वाढ
लोहगड किल्ल्यावरती दर्ग्या आहे त्यात दर्ग्यात व त्याच्या आजूबाजूला अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काही काळापासून या दर्ग्यातील कबरीच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. लोहगड गडावरील दर्ग्याच्या अतिक्रमणाची माहिती पुरातत्त्व विभागाला मिळाली असून पुरातत्त्व विभाग यासंदर्भात कोणतीच कारवाई करत नसल्याचे दिसून येत नाही.
दिशा फालक नाही, गडाची माहिती काही समजत नाही.
लोहगड किल्ल्यावरती सुरुवातीला जाताना पायऱ्यांनी वरती गेल्यानंतर महादेव मंदिर समोर दिसून येते इथून पुढे जायचं म्हटलं कोणत्या साईटला जायचं व कोणत्या बाजूला काय आहे हे दर्शवणारे दिशा फलक तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात किल्ल्याची इतिहास व माहिती काय आहे. काय नाही हे आपल्याला गडावर गेल्यावर ही समजून येत नाही. तर गडावर गडाची माहिती देणारे व तुटलेलं फलक लवकरात लवकर बसवावे अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.
छत्रपती संभाजी राजेनी केली लोहगड गडावरील अतिक्रमणा बाबत चिंता व्यक्त
काही दिवसांपूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरच्या आजूबाजूचे अतिक्रमण हटवण्यात आले. असून या गोष्टीचे स्वागत स्वतः छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केले आहे. त्याचवेळी त्यांनी ट्विटर मार्फत लोहगड तसेच विशाल गडावरील किल्ल्याकरती होणाऱ्या अतिक्रमण संदर्भात चिंता ही व्यक्त केली आहे. तसेच हे अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
लोहगड या मावळ तालुक्यातील दुर्गावर एक दर्गा बांधण्यात आला त्यास एकही ऐतिहासिक संदर्भ नाही. प्रतिवर्षी याच्या आकार, रचना व रंगात बदल दिसून येतो. शिवकाळ ते ब्रिटिश काळ आणी भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत येथे दर्गा असल्याचा कोणताच प्राथमिक पुरावा नसल्याने सदर दर्गा हा नव्याने स्थापन करण्यात आला असल्याचे निदर्शनास येते.
   येथील उरूसाची मोठी परंपरा असल्याचे जे सांगतात त्यांनी एखादा तरी पुरावा उपलब्ध करून द्यावा असे मी आवाहन करित आहे  असे इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे दुर्ग पराक्रमी इतिहासाचे साक्षी आहेत. या दुर्गांवर हे धर्मांध लोक मजारी बांधुन  अतिक्रमण करत आहेत व दिवसांगणीत हि मजारे वाढतच आहेत, ज्यांचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही. सरकारने हि अतिक्रमणं त्वरित जमीनदोस्त केली पाहिजेत. हि अतिक्रमण न काढल्यास बजरंग दल संपूर्ण महाराष्ट्रात मोठे जनआंदोलन उभे करेल असा इशारा संदेश भेगडे (विभाग संयोजक बजरंग दल) यांनी दिला.

error: Content is protected !!