वडगाव मावळ:
बैलगाडा प्रेमींसाठी पुणे जिल्ह्यात प्रथमच हुर्ररर… आली…आली.. आली..! काय आली,मित्रांनो,,,आली आहे
हॉटेल शिवराजची स्पेशल बैलगाडा मटन आणि चिकन थाळी….ही थाळी एका तासात खाऊन दाखवा अन २१हजाराचे रोख बक्षीस मिळवा,अशी ही भन्नाट बारी आहे.
अन ही बारी जुपली आहे,हाॅटेल शिवराजचे मालक अतुलशेठ वायकर यांनी.
४-५ व्यक्तींसाठी पुरेल अशी ही बैलगाडा मटन थाळी आहे,१८०० रूपयाला तर चिकन थाळी आहे १५०० रूपयाला.
एका व्यक्तीने एका तासात ही थाळी खाऊन दाखवा २१ हजार रोख बक्षिस मिळवा..असे चॅलेंज शिवराज हाॅटेल व्यवस्थापनाने दिले आहे. चार पाच जणांना पुरेल अशा या थाळीत  आहे,मटन बिर्याणी , मटन हांडी, मटन रस्सा, मटन सुक्खा, चि. तंदूर, बांगडा फ्राय, मांदेली फ्राय, अंडा बॉईल, भाकरी ५, रोटी ५, ग्रीन सलाड, फ्राय पापड, बिस्लेरी २ अशा थाळीची चव चाखायला एकदा तरी शिवराजच्या दालनात यावे लागतेच बघा.
पुणे-मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स जवळ वडगाव, ता. मावळ जि. पुणे येथे शिवराज हाॅटेल आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे.अधिक माहितीसाठी: मो. ९५६१९२९९९९ / ९७६४५८७७९९ संपर्क साधता येईल.

error: Content is protected !!