कामशेत:
उकसान  ग्रामपंचायत येथील सरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आशा विलास बांदल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान मावळत्या  सरपंच शामल अनिल इंगवले यांनी ठरलेल्या विहित वेळेमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने परिणामी सरपंच पदाची जागा रिक्त झाल्याने या निवडणुकीसाठी आशा बांदल यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.

  त्यामुळे सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी सर्कल माणिक साबळे,  सहाय्यक तलाठी सारिका माने ग्रामसेवक सतीश कालेकर यांनी जाहीर केले.
 
यावेळी उपसरपंच अमोल शिंदे, सारिका कोंढरे, सीताबाई शिंदे, आशा मोरमारे,माजी उपसरपंच सोमनाथ शिंदे, पोलीस पाटील सुषमा शिंदे, माजी उपसरपंच रोहिदास असवले, तुकाराम कोद्रे,  रोहिदास जांभुळकर, आतिश मोरे,  बबन  कोंढरे, मारुती खांडभोर, सविता शेवाळे,  सुकेशनी पेठकर, नामदेव जाधव, रामदास आलम यांस आधी संख्येने नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!