टाकवे  बुद्रुक:
टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी नदी पुलाच्या वर कार पलटी झालेल्या अपघात सुदैवाने कार मधील सर्वजण बचावले. दैवत बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.नदी पात्रावरील जुन्या पुलाच्या संरक्षक कठड्याला रिफ्लेक्टर बसवा तसेच नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या रेंगाळलेल्या कामाला गती द्या अशी मागणी आता होऊ लागली आहे.
  इंद्रायणी नदीवरील सुरक्षा कठड्याला रिफ्लेक्टर नसल्याने, व थंडीच्या दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती धुके असल्याकारणाने ( वार गुरुवार दि. 17) पहाटेच्या वेळी पाच वाजता वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरती अपघात झाला.
ही कार  खेड वरून मागारी येत असताना गाडीमध्ये दोन पुरुष व तीन महिला होत्या.  कठड्याला गाडी धडकल्यानंतर पुलावरती गाडीने पलटी मारली योगायोगाने गाडी नदीमध्ये कोसळली नाही अन्यथा खूप मोठा अनर्थ झाला असता.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही  गाडीमध्ये असणाऱ्या व्यक्तींना किरकोळ जखमा झाल्या आहेत मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावरती  नुकसान झाले आहे.
चार वर्षापूर्वी या ठिकाणी झालेल्या अपघातात कार नदीपात्रात पडून दोन तरूणांना जीव गमवावा लागला होता.
गुरुवारी झालेल्या अपघातानंतर या पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
चार वर्षापूर्वी याच पुलावरती टाकवे गावातील गाडी नदीमध्ये कोसळून टाकवे येथील दोन  तरुणांचा जीव गेला तर त्यामध्ये एक तरुण पाण्यामध्ये पोहून  बाहेर आला होता.  दरम्यान नवीन फुलाचे काम सुरू आहे मात्र मागे काही महिन्यांपासून ते काम काय कारणास्तव बंद आहे अद्याप ते काम सुरू झालेले नाही. या धोकादायक पुलावरून प्रवास संपणार तरी कधी असा नागरिक प्रश्न उपस्थित करत आहे
सेवा फाउंडेशन अध्यक्ष गणेश गुरव म्हणाले,”
या रस्त्याने कामानिमित्ताने आम्ही दिवसभर तसेच रात्री आपरात्री नेहमीच प्रवास करत असतो. मात्र सार्वजनिक बांधकाम वडगाव मावळ विभाग यांचे या ठिकाणी नेहमीच दुर्लक्ष असल्याचे जाणवते. कठाडे रेलिंगला दोन्ही बाजूने तसेच पाठपोट रिफ्लेक्टर असणे आवश्यक आहे.
माजी उपसरपंच रोहिदास असवले म्हणाले,”
तीन वर्षापूर्वी सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी रिप्लेटर लावण्याचे काम केले होते. त्यानंतर अद्याप या ठिकाणी सार्वजनिक बांधकामांकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. ते रिफ्लेक्टर पूर्णपणे जीर्ण झालेले आहेत. तसेच या पुलावरती झेड सेक्शन मध्ये लाईट असणे अत्यावश्यक आहे. रेलिंगचे पाईप पूर्णपणे कमकुवत आहेत ते चांगल्या दर्जाचे व उत्कृष्ट क्वालिटीचे असणे गरजेचे आहे.
पोलीस पाटील अतुल असवले म्हणाले,”
50 ते 60 गावांचा मुख्य वर्दळीचा नदीवरील पूल आहे. ज्या भागात गाडीचा अपघात होऊन दोन्ही बाजूंच्या रेलिंग तुटल्या आहेत त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रॅलींग लावणे गरजेचे आहे. सूचना फलक लावणे अत्यावश्यक आहे.

error: Content is protected !!