करंजगाव येथे जनआरोग्य समितीची एकदिवसीय कार्यशाळा
करंजगाव  (अथर्व अग्रहारकर):
खडकाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, करंजगाव आरोग्यवर्धिनी केंद्र या ठिकाणी १२ नोव्हेंबर २०२२ या दिवशी जन आरोग्य समितीची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळा घेण्यासाठी “सेव्ह द चिल्ड्रन” च्या मुख्य कार्यालय दिल्ली येथून जसविंदर कौर व महाराष्ट्र राज्याच्या कार्यालयामधून अपर्णा जोशी उपस्थित होत्या.
जन आरोग्य समितीमार्फत उपकेंद्रांतर्गत कशाप्रकारे कार्य करता येईल यावर सखोल माहिती दिली. त्यामध्ये भौतिक सुविधा, आरोग्यविषयक सेवा, आरोग्य विषयक विविध कॅम्प घेणे याविषयी चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॉरमॅट वापरून त्यानुसार उपकेंद्रामध्ये असणाऱ्या सुविधांना रंगांप्रमाणे मार्किंग करण्यात आले. याप्रकारे उपस्थित सर्वांनी कार्यशाळेमध्ये प्रत्यक्षात भाग घेऊन यावरती कशाप्रकारे सुधारणा होऊ शकते हे ठरवण्यात आले व यासाठी दर दोन महिन्यातून अशी कार्यशाळा घ्यावी व मागील कार्यशाळेमध्ये ठरलेले मुद्दे व त्यावर झालेले काम याच्यावरती प्रत्यक्षात चर्चा करावी असे ठरविण्यात आले .
काम करत असताना आरोग्य खात्यामधील व्यक्तींना येणाऱ्या अडचणींवरती समुदायातून कशी मदत होऊ शकते यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
याचबरोबर गावामध्ये असलेल्या ग्रामपंचायत, ग्राम आरोग्य पोषण स्वच्छता पाणीपुरवठा समिती, महिला बचत गट यांच्यासमोरही हे विषय मांडून त्यांना असणाऱ्या अडचणी व त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना यावरती चर्चा करण्यात आली.
प्रशिक्षणानंतर प्रत्यक्षात काम कसे करायचे याचे प्रात्यक्षिक करंजगाव मध्ये घेण्यात आले. समितीमध्ये उपकेंद्र अंतर्गत  येणाऱ्या गावातील सर्व ग्रामपंचायत मधील सरपंच यांचा सहभाग असतो. जन आरोग्य समितीच्या संरचनेप्रमाणे समितीमध्ये खालील प्रमाणे व्यक्तींचा सहभाग आहे.
यासाठी जन आरोग्य समितीचे सर्व सदस्य प्रात्यक्षिकासाठी उपस्थित होते .यामध्ये अध्यक्ष दिपाली साबळे (करंजगाव, सरपंच) डॉ. अनिल सुखदेव गिरी खडकाळा(प्राथमिक आरोग्य केंद्र, खडकाळा) उपाध्यक्ष डॉक्टर विकास जाधवर (सचिव, समुदाय आरोग्य अधिकारी) , संगीता आढारी (सरपंच नाणे), नवनाथ ठाकर सदस्य( उप – सरपंच करंजगाव) स्वामी गायकवाड ( ग्रा. कोंडीवडे, सदस्य) नितीन अंबिके (उपसरपंच, नाणे), प्रफुल मनवर सदस्य (MPW), आयोध्या चव्हाण (ANM),  प्रदीप दिवेकर  सदस्य(शिक्षक, करंजगाव) व उपकेंद्रात येणाऱ्या सर्व आशाताई व “सेव्ह द चिल्ड्रन” चे स्टाफ उपस्थित होते.
दीपाली साबळे (अध्यक्ष, जनआरोग्य समिती)   म्हणाल्या,”  “ह्या उपक्रमांतर्गत आरोग्य खात्यामधील व्यक्तींना येणाऱ्या अडचणींवरती समुदायातून कशी मदत होऊ शकते यासाठी प्रयत्न करण्यात येईल.”

error: Content is protected !!