वीज बिल भरा; अन्यथा रात्रीपासून वीज कट.फ्रॉड संदेशमुळे नागरिक बुचकळ्यात
करंजगाव( अथर्व अग्रहारकर)   :
तुमच्या घरचा वीजपुरवठा रात्री साडेदहा नंतर बंद करण्यात येईल. बिल न भरल्यास या महिन्यापासून विजपुरवठा होणार नाही. त्यासाठी लगेच 9875678121 ह्या नंबर वर संपर्क करा. अश्या बनावट व खोट्या आशयचा संदेश मावळ तालुक्यातील अनेक जणांना येत आहे. त्यामुळे आता चोरांचा ऑनलाईन सुळसुळाट झालेला पाहायला मिळत आहे.
ह्याद्वारे बनावट संदेश पाठवून नागरिकांच्या खात्यातील माहिती व भरण्यास सांगितले जाते. परिणामी दिवसाढवळ्या नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारतानाचे चित्र आहे.
मावळ तालुक्यातील कामशेत, मळवली, करंजगाव, वडगांव, नाणे मावळ, गोवित्री, कोंडीवडे ना. मा., कोंडेश्वर, जांभवली अशा विविध भागातील नागरिकांना बनावट संदेश प्राप्त झालेले आहेत. काहींना वीजबिल भरून देखील अश्या प्रकारचे संदेश मिळाल्याने नागरिक बुचकळ्यात पडत आहेत. तर काहींच्या नावावर विजेची नोंदणी नसताना अश्या प्रकारचे संदेश येत आहेत.
6291744938 ह्या WhatsApp क्रमांकावरून संदेश पाठवला जात आहे. हा क्रमांक महावितरणच्या नावाने दाखवत असल्याने अनेक जण ह्याला बळी पडत आहेत. परंतु हा क्रमांक फ्रॉड असल्याचे समजत आहे.
त्यानंतर नागरिकांनी वीजबिल भरण्यासाठी लिंक वर क्लिक केल्यानंतर एक अँप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले जाते. त्यात सर्व बँकेची माहिती मागवली जाते. परंतु महावितरण कडून मेलद्वारे किंवा हार्डकॉपी घरी येत असतानाही नागरिक ह्याची शहानिशा करताना दिसून येत नाहीये. त्यामुळे लाखो रुपयांचा गंडा घातलेला दिसून येत आहे.
विवेक सूर्यवंशी (उप – कार्यकारी अभियंता, महावितरण) “महावितरण कडून असे कुठल्याही प्रकारचे संदेश पाठवण्यात येत नाहीत. जे संदेश महावितरणकडून पाठवले जातात ते व्हीके, व्हीएम व एमएसईडीसीएल च्या नावाने पाठवले जातात. अश्या फ्रॉडपासून नागरिकांनी सतर्क राहावे.”
संजय तुंगार (पोलीस निरीक्षक, सायबर विभाग) “अश्या प्रकारच्या संदेशावर कोणीही खात्री केल्याशिवाय विश्वास ठेऊ नये. किंवा कोणत्याही सायबर सारख्या फ्रॉडमध्ये खात्री केल्याशिवाय विश्वास ठेऊ नये.”

error: Content is protected !!