निगडे:
कॅनरा बँक तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे निगडे  गावातील महिला ,कामगार व शेतकरी यांचे जनधन खाते  उघडून त्यांना शासनातर्फे पुरवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ,प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना व अटल पेन्शन योजना, या योजनांमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले.
बॅकेचे अधिकारी अरुण कुमार सिन्हा, चीफ मॅनेजर कॅनरा बँक
विकास सूर्यवंशी कृषी अधिकारी, कॅनरा बँक  विनायक खंदारे, ग्राहक संबंध अधिकारी, कॅनरा बँक यांनी बॅकेच्या विविध योजनांची माहिती दिली.
प्रथम लोकनियुक्त सरपंच सविता बबुशा भांगरे,उपसरपंच भिकाजी भागवत , धोंडिबा भागवत ,बबुशा भांगरे,.किरण भांगरे ,आत्माराम थरकुडे, संतोष भांगरे,नारायण शेजवळ, शांताराम शेजवळ ,पूजा भांगरे,माधूरी हेगाडे ,शलाका साळवे,रोशणी साळवे, मंथन भांगरे यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

You missed

error: Content is protected !!