मुंबई:
भामा आसखेड धरणग्रस्तांचे प्रश्न कित्येक वर्षांपासून तसेच पडून आहेत. या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट आझाद मैदानावर धरणे धरण्याची घोषणा केली. कित्येक वर्षे शांततेच्या मार्गाने गेलेले शेतकरी थेट शासनाच्या दारावर जाऊन लढा देऊ लागले आहे. धरणाचे पाणी पेटत आहे,
आमचं पाणी पुण्याला चाललय , पिंपरी चिंचवड ला चाललय , उजनीला चाललय , MIDC ला विकल जातय , २२ गावच्या योजना झाल्या , उद्या  चाकण – आळंदी ला पाणी विकल जाईल पण आमच्या प्रलंबित प्रश्नांचे काय? असा प्रश्न उपस्थित करून शेतकरी धरणे धरीत आहे.
  लाभक्षेत्राचे शिक्के उठवण्याचे काम कधी  होणार आहे, कालवा रद्द झाला, हायकोर्टाने जमिनी देण्याचे आदेश दिले , सरकारकडे जमिन नाही , ६५% रकमेचा गोंधळ झाला, १११ शेतकर्यांना जमिनी भेटल्या, काही भुमिहीन झाले , पाण्याच नियोजन फसलय असा आक्षेप शेतकरी घेत आहे.
  या धरणग्रस्त शेतक-यांना न्याय मिळावा यासाठी   सर्व पक्षिय नेते  एकत्र आले, आंदोलन झाली पण त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याची टीका होत आहे.
    या आंदोलनांनी धरणग्रस्थांचे प्रश्न उजेडात येतात ऐवढच, पण बाकी प्रश्न मात्र तसेच पडून. आमची एक पिढी गेली मिटींगा झाल्या , सभा झाल्या , आंदोलने झाली …. हे त्यांनी पाहिले पण प्रश्न काही सुटले नाही. दुसरी पिढीही तेच अनुकरण करते की काय अशी भीती वाटत असल्याचे सुभाष तळेकर म्हणाले.
पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे , सर्वांना पाणी मिळायला हवय, पाण्याचा योग्य विनियोग करा, पाणी वाटपाचे फेरनियोजन करा.परंतू  धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच नाक दाबावेच लागणार आहे , यासाठी शंकर साबळे आणि काळूराम गडदे हे दोन धरणग्रस्त शेतकरी आझाद मैदान (मुंबई) येथे दिनांक १४/११/२०२२ वार सोमवार पासुन बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला एक धरणग्रस्त शेतकरी म्हंणुन आम्ही पाठिंबा देत आहोत. फक्त पाठिंबाच देत नाही तर त्यांचे सोबत आझाद मैदान धरणे आंदोलनात सहभागी होणार आहे.
आमची सर्व धरणग्रस्त बांधवांना एक नम्रतेची विनंती आहे, पक्षिय राजकारण बाजुला ठेवा , नेत्यांचे हेवेदावे , श्रेयवाद दुर ठेवा … एकजुट दाखवा….!! ज्या धरणग्रस्त बांधवांना जस जसा वेळ मिळेल तसं तसे त्यांनी आझाद मैदाना मधिल धरणे आंदोलनात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सुभाष तळेकर  अध्यक्ष मुंबई डबेवाला असोशिएशन यांनी केले.

error: Content is protected !!