मुंबई:
अंगणवाडी सेविकांच्या विविध  मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने १५ नोव्हेंबरला आझाद मैदान, मुंबई येथे अंदोलन करण्यात येणार आहे.३१ ऑक्टोबरला कृती  समितीने शासनाला मागणीपत्रक पाठवले होते.यात मानधनवाढ, पोषण ट्रॅकरवर काम करण्याची सक्ती न करणे, थकित सेवा समाप्ती लाभ, ग्रॅच्युइटी बाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी यासह अन्य मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली.
या निवेदनाद्वारे आपण १५ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढणार असल्याची नोटीस बजावली होती.परंतु या मागण्यांबाबत शासन गंभीर नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शासनाने कोणतीही पावले उचललेली नाहीत त्यामुळे १५ तारखेच्या मोर्चात आपली संपूर्ण ताकद उतरवणार आहोत,असे  कृती समितीने जाहीर केले आहे.
१५ नोव्हेंबरच्या मोर्चात शासनाने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास *मासिक अहवालावर बहिष्कार* टाकला जाईल.
पोषण ट्रॅकर जोपर्यंत पूर्णपणे मराठीत उपलब्ध होत नाही, त्यातील सर्व त्रुटी दूर होत नाहीत तोपर्यंत त्यावरच्या आपल्या बहिष्काराचे अजूनच निर्धाराने पालन केले जाईल.
शासनाने अंगणवाड्या खाजगी संस्थांना दत्तक देण्याचा घाट घातला आहे. कृती समितीने या खाजगीकरणाच्या पावलाला रोखण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
आपल्या मागण्या मान्य न झाल्यास सर्व स्तरांवर भव्य मोर्चे काढले जातील. तसेच वेळ पडल्यास बेमुदत संपावर जाण्याची तयारी केली जाईल,असा इशाराच देण्यात आला आहे.
१५ नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत सूचना देण्यात आल्या असून या सुचनांचे पालन करावे असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सर्व आणि विशेषतः मुंबई जवळच्या जिल्ह्यांनी मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोर्चात उतरवावे.
१५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ पासून आझाद मैदानावर निदर्शने सुरू होतील.
जोपर्यंत मुख्यमंत्र्यांशी शिष्टमंडळाची चर्चा होऊन तोडगा निघत नाही तोपर्यंत निदर्शने सुरूच राहतील.
सर्वांनी मुक्कामाच्या तयारीने यावे. आवश्यक ते कपडे, चादर इ. साहित्य सोबत घेऊन यावे.
कुणीही दागिने घालून येऊ नये
असे आवाहन एम ए पाटील,शुभा शमीम,कमल परुळेकर      दिलीप उटाणे,भगवानराव देशमुख,जीवन सुरुडे ,जयश्री पाटील यांनी केले आहे.
अंगणवाडी सेविका कृती समितीच्या मावळ तालुका अध्यक्षा अनिता कुटे म्हणाल्या,” राज्य व्यापी या अंदोलनात मावळ तालुक्यातील जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका सहभागी होतील. शासनाने अंगणवाडी सेविका यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.

error: Content is protected !!