वडगाव मावळ:
कार्तिकी एकादशी सोहळया निमित्त श्रीक्षेत्र आळंदीला कोकण भागातुन येणाऱ्या पायी दिंड्याना वाहतुक पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी केली.
म्हाळस्कर यांनी  मावळचे  तहसीलदार मधुसूदन बर्गे व पोलीस प्रशासनाला या आशयाचे निवेदन देऊन ही मागणी केली.
श्रीक्षेत्र आळंदी येथे कार्तिकी एकादशी  मोठ्या आनंदात उत्साहात साजरी केली जाते. या कार्तिकी एकादशी निमित्त कोकण भागातून अनेक पायी दिंडया येत असतात,पायी  दिंडीत येणा-या वारकरी बांधवाच्या सुरक्षिततेसाठी ही मागणी करताना म्हाळसकर यांनी मागील वर्षी झालेल्या घटनेची आठवण करून दिली.
मगील वर्षी साते, ता. मावळ या ठिकाणी पायी चालणान्या दिंडीमध्ये पिकअप वहान घुसून अपघात झाला होता. या काही वारकरी जखमी झाले व काहींना प्राणास मुकावे लागले.
तर नुकतेच पंढरपुर येथे दि. ०४ नोव्हेंबर २०२२ रोजी जठारवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापुर येथून पंढरपुरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीत जुनोनी ता. सांगोला येथे दि. ३१ ऑक्टोंबर १२२ रोजी मोटार घुसल्याने दिंडीतील सात वारकरी ठार झाले आहेत. हा अनुभव  घेऊन योग्य ती खबरदारी घेऊन त्यावर उपाययोजना करणे हे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हाळसकर यांनी सागितले.
येत्या काही दिवसात पायी दिंडया मावळ तालुक्यामध्ये प्रवेश करणार आहे .या पायी दिंड्यांना मावळ तालुक्यातुन जाणान्या राष्ट्रीय महामार्गावर व राज्य योग्य ते वाहतुक नियोजन व वाहतुक पोलीस संरक्षण द्यावी अशी अपेक्षा म्हाळसकर यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!