रमेशकुमार साहनी शाळेत एस. एस. सी बोर्ड परीक्षेसंदर्भात व्याख्यान संपन्न
वडगांव मावळ : (अथर्व अग्रहारकर) येथील रमेशकुमार साहनी शाळेमध्ये बुधवारी (दि.१६) एस. एस. सी बोर्ड संदर्भात विस्तार व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. यावेळी विस्तार व्याख्यानाचे अध्यक्ष प्राचार्य साईलक्ष्मी होत्या.
व्याख्यानाचे मुख्य मार्गदर्शक व ज्येष्ठ पत्रकार शिवानंद कांबळे यांनी आपल्या विस्तार व्याख्यानास प्रारंभ करून सर्वप्रथम उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्याचे अभिनंदन करून आपण या प्रशस्त शाळेमध्ये प्रवेशित झालात म्हणून नशीबवान आहात असा विद्यार्थ्यांचा सन्मान वाढविला.
यानंतर विद्यार्थ्यांना एस. एस. सी परीक्षेकरिता प्रोसाहित केले.
यावेळी त्यांनी स्वतःला आणि आपल्या काबाड कष्ट करणाऱ्या आई – वडिलांना फसवू नका असा मोलाचा सल्ला देवून आपण एस. एस. सी परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करा असा सल्ला दिला.

error: Content is protected !!