नूतन विद्या मंदिरच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अकरा हजार लख्ख लख्ख दिव्यांनी उजळले  परांजपे विद्या मंदिर
तळेगाव दाभाडे:
ॲड.पु.वा. परांजपे विद्या मंदिर या शाळेचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून या निमित्ताने  विद्यालयात  दीपोत्सव साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमाचा शुभारंभ शिक्षण महर्षी, मावळ भूषण, माजी आमदार कृष्णरावजी भेगडे  यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आला.
  यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार,यादवेंद्र खळदे,विनायक अभ्यंकर, शंकर नारखेडे,डॉ.प्रमोद बोराडे, डॉ.सत्यजित खांडगे, डॉ.संदीप कांबळे, संदीप पानसरे, अमर जीत ढालपे माजी शिक्षिका चेतना वैद्य ,माजी विद्यार्थी शालेय समिती सदस्य अशोक काळोखे,रमाकांत नायडू, नगरसेवक संतोष भेगडे बासरकर मॅडम आजी माजी शिक्षक विद्यार्थी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील  मंडळी उपस्थित होते.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थेचे संचालक यादवेंद्र खळदे, विनायक अभ्यंकर, डॉ. प्रमोद बोराडे,  डॉ.सत्यजित खांडगे, नगरसेवक माजी विद्यार्थी संतोष भेगडे, माजी विद्यार्थिनी आदर्श शिक्षिका सौ उर्मिला बासरकर  यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार कृष्णराव भेगडे म्हणाले,”तंत्र युगात नव्या पिढीच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्या पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी सर्व संस्थाचालक प्रयत्नशील आहेत
मी स्वतः या शाळेचे विद्यार्थी असून  शाळेच्या स्थापनेपासून ते शाळेची भव्य इमारत उभारण्या पर्यंतचा   प्रगतीचा चढता आलेख मी अनुभवले आहेत .या शाळेत स्नेह मेळाव्याचे प्रमाण जास्त स्वरूपात असून माजी विद्यार्थी शाळेला सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहेत .
  चारित्र्यसंपन्न व देशभक्त विद्यार्थी घडवणे असा संस्थेचा इतिहास आहे   अमृत महोत्सवी वर्षात विद्यालयामध्ये विविध व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून साजरे करावे
त्या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरात जागृती करावी  दिल्या .
यावेळी १९९७-९८ च्या बॅचने अमृत महोत्सव वर्षानिमित्त शाळेला प्रिंटर भेटवस्तू प्रदान केले. याच बॅचमधील देवेंद्र मखामले  या विद्यार्थ्याने ड्रोन शूटिंगची व्यवस्था केली.
भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्मिक महत्त्व असणाऱ्या दिव्याची माहिती शाळेतील अध्यापिका  कांचन देशमुख यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक  पांडुरंग पोटे यांनी केले. आभार शालेय समिती अध्यक्ष नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव  नंदकुमार शेलार यांनी मानले.
सूत्रसंचालन अध्यापिकावैशाली कोयते यांनी केले. कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, पर्यवेक्षक पांडुरंग कापरे, धनंजय नांगरे,शरद जांभळे नरेंद्र इंदापूर,विजय मुळे, संपत गोडे,संतोष घरदाळे आणि सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या प्रयत्नातून उत्कृष्टरित्या पार पडला.

error: Content is protected !!